Others News

महात्मा फुले जन आरोग्य योजना ही दोन जुलै 2012 रोजी महाराष्ट्र सरकारने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने सुरु केले होती. आताही 2017 पासून ही योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना म्हणून ओळखली जाते. सुरवातीला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने सुरू केलेली ही योजना फक्त आठ जिल्ह्यात राबवण्यात येत होती. परंतु आता ती पूर्ण 28 जिल्ह्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना या नावाने राबविण्यात येते. कोण घेऊ शकता या योजनेचा लाभ? 1- या योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील लोक ज्यांच्याकडे पिवळा किंवा ऑरेंज कार्ड आहे अशीच लोकघेऊ शकता. 2- या योजनेअंतर्गत अशा कुटुंबीयांची मेडिकल सेवा, हॉस्पिटलझेशन आणि सर्जरी सुद्धा कव्हर केले जातात.

Updated on 30 June, 2021 8:41 PM IST

 महात्मा फुले जन आरोग्य योजना ही दोन जुलै 2012 रोजी महाराष्ट्र सरकारने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने सुरु केले होती. आताही 2017 पासून ही योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना म्हणून ओळखली जाते. सुरवातीला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने सुरू केलेली ही योजना फक्त आठ जिल्ह्यात राबवण्यात येत होती. परंतु आता ती पूर्ण 28 जिल्ह्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना या नावाने राबविण्यात येते.

 कोण घेऊ शकता या योजनेचा लाभ?

  • या योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील लोक ज्यांच्याकडे पिवळा किंवा ऑरेंज कार्ड आहे अशीच लोकघेऊ शकता.
  • या योजनेअंतर्गत अशा कुटुंबीयांची मेडिकल सेवा, हॉस्पिटलझेशन आणि सर्जरी सुद्धा कव्हर केले जातात.

महाराष्ट्र सरकारच्या स्वास्थ्य मंत्रालय द्वारे राबवल्या जाणाऱ्या या योजनेचा मुख्य हेतू हाच आहे की, समाजातील गरीब परिवारांना महागड्या वैद्यकीय सेवा सुविधांचा लाभ घेता यावा.  पिवळे किंवा केशरी रेशनकार्डधारकच्या परिवारात कोणी आजारी पडलं तर त्यांना महागड्या वैद्यकीय सुविधांचा लाभ या योजनेद्वारे घेता येतो. या आजाराच्या उपचारासाठी महाराष्ट्राचे 36 जिल्ह्यांमधील हॉस्पिटल निवडले गेले आहे

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी

1महाराष्ट्रात ज्या परिवाराकडे ऑरेंज किंवा येलो रेशन कार्ड आहे.

2-ज्या जोडप्याला दोन पेक्षा जास्त अपत्य नाहीत अशी जोडपी

  • या योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्र राज्याचे नागरिक घेऊ शकतात.
  • शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे असे शेतकरी
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण परिवाराचे वर्षाचे उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी असला पाहिजे.

या योजनेअंतर्गत जवळ-जवळ 971 प्रकारच्या सर्जरी, थेरपी आणि मेडिकल प्रोसेसर कव्हर केला जातात आणि या सगळ्यांची विभागणी एकूण 30  प्रकारात केले आहे. जसे की  कार्डियाक सर्जरी, जनरल सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी इत्यादी कव्हर केले जातात.

 या योजनेसाठी अर्ज कसा करावा?

https://www.jeevandayee.gov.in या योजनेसाठी ची ऑफिशिअल वेबसाईट आहे त्यावर तुम्ही  अर्ज  करू शकता

1-https://www.jeevandayee.gov.in/ ही वेबसाइट ओपन केल्यावर तुमच्या कम्प्युटर स्क्रीन वर या योजनेची शासनाद्वारे तयार केलेल्या अधिकृत वेबसाइटचे होम पेज उघडते.

2-होमपेजवर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

3-

यानंतर तुमच्या स्क्रीन वरील फॉर्म उघडलेला दिसतो. त्यात विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे टाईप करून द्यावे लागतील. इथे यादी असलेली सगळी सर्टिफिकेट स्कॅन करून, अपलोड करून जोडावे लागतील.

4- यानंतर सबमीट असा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून फॉर्म सबमिट करता येतो.

 

 योजनेसाठी  लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • निदान केलेल्या आधाराचा सर्टिफिकेट जे सरकारी डॉक्टरांनी दिलेले असावे.
  • अप्लाय करणाऱ्या व्यक्तीचे तीन पासपोर्ट साईज फोटो
  • उत्पन्नाचा दाखला
  • वयाचा दाखला
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
English Summary: mahatma fhule janaarogya yojna
Published on: 30 June 2021, 08:41 IST