पंजाब मध्ये भंटीडा येथे 6, 7 जून रोजी आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन गुरू काशी विद्यापीठ, (भा. कृ. अ. प. मान्यताप्राप्त ), कृषि - पर्यावरण शिक्षण व शेतकरी कल्याण सोसायटी( AEEFWS) तसेच जस्ट अँग्रीकल्चर मासिक यांच्या मार्फत करण्यात आले होते.सदर कार्यशाळा मध्ये विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या वेळी संपूर्ण भारतातुन युवा कृषि उद्योजक म्हणुन विविध मान्यवर उपस्थित होते.त्या वेळी आपल्या महाराष्ट्र मधून युवा कृषि उद्योजक म्हणुन निखिल रमेश यादव (Msc. Agri) संस्थापक व अध्यक्ष कृषि शास्त्र समुह यांना सदर पुरस्कार देण्यात आला
निखिल रमेश यादव कृषि शिक्षण घेताना शेतकरी संवाद , कृषि पोर्टल मार्फत शेतकरी मित्रांना तांत्रिक माहिती पुरवणे विविध संस्था मिळून आंतराष्ट्रीय कार्यशाळा आयोजन, कृषि विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन, शेतकरी तसेच कृषि विद्यार्थी प्रश्न लोक नेत्यांन समोर मांडणे, श्री कृष्ण भूमि शेतकरी उत्पादक कंपनी, सेलु मार्फत शेतकरी मित्रांना मूल्य संवर्धन साखळी तयार करणे, उच्च तंत्रज्ञान उदा. ड्रोन , ब्लॉक चैन, नॅनो तंत्रज्ञान, ऊती संवर्धन सोप्या भाषेत उपलब्ध करून देणे.
अश्या विविध कार्याची दखल घेत श्री निखिल यादव यांना गुरू काशी विद्यापीठ, AEEFWS तसेच जस्ट अँग्रीकल्चर मासिके मार्फत पंजाब मध्ये सुंदर अश्या गुरू काशी विद्यापीठ मध्ये विविध मान्यवरांन सन्मानित करण्यात आले.तसेच त्यांच्या कृषिशास्त्र समूहास आज महाराष्ट्र पातळीवरून हजारो शेतकरी जोडले गेले आहे.निखिल यादव यांच्यासोबत संपर्क करता त्यांनी त्यांच्या कार्याचे श्रेय त्यांचे गुरुवर्य प्रा.लांडे सर, प्रा दुर्गे सर, प्रा. पाडेकर सर, प्रा.वाकोडे सर, प्रा शिंदे सर प्रा. बकाल सर मोठे वडील राजेंद्र यादव यांना दिले.
तसेच या प्राध्यापकांच्या प्रात्यक्षिक शिक्षण प्रणालीमुळे त्यांच्यात कृषि क्षेत्रात बद्दल नावीन्य कार्य करण्याची आपुलकी निर्माण झाली आहे असे ते सांगतात.महाराष्ट्र मध्ये वर्धा जिल्ह्यातील खासदार रामदास जी तडस विधानसभा आमदार पंकज दादा भोयर,माळशिरस विधानसभा युवा आमदार सातपुते दादा,अमरावती जिल्हा परिषद सदस्य प्रकाश दादा साबळे,तसेच त्यांचे काका प्रकाश भाऊ डुकरे या सगळ्यांनी महाराष्ट्र तसेच वर्धा जिल्ह्याचे नाव याच प्रमाणे रोषन करावे याकरिता निखिल यादव यांना शुभेच्छा प्रदान केल्या.
Published on: 09 June 2022, 01:04 IST