प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने मध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत महाराष्ट्राने देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकावला. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पुणे आणि नगर जिल्ह्यांना गौरवण्यात येणार आहे.
राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्यामुळे महाराष्ट्राचे गावाचा देशपातळीवर गौरव होणार असल्याचे सांगत कृषी मंत्री दादा भुसे यांनी विभागाचे कौतुक केले आहे.
या योजनेला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने देशातील निवडक जिल्ह्यांचा सत्कार 24 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत एक कोटी 14 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून आतापर्यंत एक कोटी पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अकरा हजार 633 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. या योजनेच्या संदर्भात जवळ-जवळ आत्तापर्यंत 38 हजार 991 तक्रारी नोंद करण्यात आले आहेत. त्या पैकी 23 हजार 632 तक्रारींचा निपटारा केल्याने राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
पंतप्रधान शेतकरी योजनेसाठी कसा कराल नोंदणी /अर्ज
या योजनेसाठी अर्ज करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सर्वप्रथम तुम्ही भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर www.pmkisan.gov.in/ जा. आणि पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या योजनेसाठी स्वत:च्या नावाची नोंदणी करा. https://www.pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx येथे शेतकऱ्यांची नोंदणी अर्ज भरणे आणि स्वत:ची नोंदणी करावी. याशिवाय शेतकरी महसूल अधिकारी किंवा पंतप्रधान शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याकडे संपर्क करु शकता. किंवा आपल्या जवळील सामान्य सेवा केंद्रा (सीएससी)वर जाऊ शकतात. आणि किमान समर्थन योजनेसाठी अर्ज करु शकता.
पंतप्रधान शेतकरी योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे
- आधार कार्ड.
- बँक खाते.
- सातबारा उतारा.
- रहिवाशी दाखला.
नोंदणी झाल्यानंतर www.pmkisan.gov.in/ या लिंकवर जाऊन अर्ज, देयक, आणि इतर तपशीलाची चौकशी करत रहावी.
पंतप्रधान किसान पोर्टलवर किसान कॉर्नर (शेतकरी कॉर्नर) या पर्यायात खालील अजून काही सुविधा आहेत.
- नवीन शेतकरी नोंदणी.
- आधार कार्ड रिकॉर्ड संपादित करा.
- लाभार्थ्यांची स्थिती.
- स्व :नोंदणी/ सीएससीची स्थिती.
- पीएम किसान अॅप डाऊनलोड करा.
पंतप्रधान शेतकरी निधी योजनेची स्थिती आणि लाभार्थ्यांची यादीची चौकशी कशी कराल
- पंतप्रधान शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईट - www.pmkisan.gov.in/ वर जा.
- मेनू बार वर असलेल्या किसान कॉर्नर (शेतकरी कॉर्नर) वर क्लिक करा.
- आता या लिंकवर क्लिक करा ज्यात लाभार्थींची स्थिती आणि लाभार्थी यादी आहे. त्यात तुम्ही चौकशी करू शकता.
- जर तुम्ही लाभार्थी यादीची चौकशी करत असाल तर तुम्ही आपले राज्य, जिल्हा, उप- जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव तेथे टाका.
- मग अहवाल मिळवा वर क्लिक करा.
Published on: 23 February 2021, 03:56 IST