Others News

महाराष्ट्र शासनाने कृषीदिन हा 1 जूलै रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.

Updated on 01 July, 2019 8:23 AM IST


महाराष्ट्र शासनाने कृषीदिन हा 1 जूलै रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.

हरित क्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांचा जीवनप्रवास:

1 जुलै 1913

यवतमाळ जिल्‍हातील पुसद तालुक्‍यातील गहुली येथे बंजारा जमातीच्‍या सधन शेतकरी कुटुंबात जन्‍म.

1933

नागपूर येथील नील सिटी हायस्‍कूलमधून मॅट्रिक परीक्षा उत्‍तीर्ण.

1937

मॉरिस कॉलेज, नागपूर (सध्‍याचे वसंतराव नाईक सामाजिक विज्ञान संस्‍था) येथून बी.ए. पदवी परीक्षा उत्‍तीर्ण.

1940

नागपूर विद्यापीठ विधी महाविद्यालयातून एल.एल.बी पदवी उत्‍तीर्ण.     

1941

प्रारंभी अमरावतीचे प्रख्‍यात वकील कै. बॅ. पंजाबराव देशमुख ह्यांच्या बरोबर व नंतर पुसद येथे स्‍वतंत्रपणे वकिली व्‍यवसायास प्रारंभ.

 

पुसद तालुक्‍यातील आदर्श ग्राम चळवळीत पुढाकार.

 

त्‍यांच्‍या प्रयत्‍नांमुळे व तळमळीमुळे त्‍यांचे स्‍वत:चे गाव ‘गहुली’ हे आदर्श गाव बनले.

6 जुलै 1941

प्रतिष्ठित ब्राम्‍हण घराण्‍यातील कु. वत्‍सला घाटे यांच्‍याशी विवाह केला. हा वि‍वाह आंतरजातीय असल्‍यामुळे त्‍यांच्‍या बंजारा समाजात मोठी खळबळ उडाली. काही दिवस त्‍यांना वाळीत देखील टाकण्‍यात आले.

1946

पुसद नगरपालिकेच अध्‍यक्ष म्‍हणून निवड. जुन्‍या मध्‍यप्रदेश राज्‍यात उपमंत्री म्‍हणून 1952 मध्‍ये नियुक्ती होईपर्यत याच पदावर होते. ह्या अवधीत सुधारणाविषयक अनेक कामे केली.

1950

पुसद हरिजन मोफत वसतिगृहाचे व दिग्रस राष्‍ट्रीय मोफत छात्रालयाचे अध्‍यक्ष.

1951

विदर्भ प्रदेश कॉंग्रेस समितीचे व कार्यकारिणीचे सदस्‍य.

1952

पहिल्‍या सार्वत्रिक निवडणुकीत मध्‍यप्रदेश मंत्रिमंडळात महसूल खात्‍याचे उपमंत्री म्‍हणून नियुक्‍ती.

 

ह्याच काळात मध्‍यप्रदेश गृहनिर्माण मंडळाचे अध्‍यक्षपद भूषविले.

 

मध्‍यप्रदेश भू-सुधार समितीचे उपाध्‍यक्ष व मध्‍यप्रदेश सरकारच्‍या मेट्रिक समितीचे अध्‍यक्ष होते.

1956

राज्‍य पुनर्रचनेनंतर जुन्‍या मुंबई राज्‍यात सहकार, कृषी, दुगधव्‍यवसाय या खात्‍यांचे मंत्री म्‍हणून नियुक्‍ती.

 

अखिल भारतीय कॉंग्रेसचे तसेच महाराष्‍ट्र विभागीय कॉंग्रेस समितीचे व तिच्‍या कार्यकारिणीचे तेव्‍हापासून सदस्‍य.

1957

सार्वत्रिक निवडणुकीत विधानसभेत पुसद मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवड झाली. महाराष्‍ट्र मंत्रिमंडळात कृषीमंत्री म्‍हणून नियुक्‍ती.

 

इंडिया कौन्सिल ऑफ एग्रिकल्‍चरल फायनान्‍स सोसायटीचे सभासद म्‍हणून निवड.

1958

जपानला गेलेल्‍या आंतरराष्‍ट्रीय राईस कमिशनच्‍या भारतीय शिष्‍टमंडळात समावेश व जपानला भेट, टो‍कीयो येथे एफ.ए.ओ.च्‍या बैठकांना हजर.

1959

पुसद येथे ‘फुलसिंग नाईक कॉलेज’ ची स्‍थापना. चिनी सरकारच्‍या शेतकी संघटनेच्‍या निमंत्रणावरुन चीनला भेट.

1960

महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेनंतर राज्‍याच्‍या प‍हिल्‍या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्‍हणून नियुक्‍ती. ह्या वेळी शासनाने महत्‍वपूर्ण असा कमाल जमीनधारणा क्षेत्रासंबंधीचा कायदा संमत केला.

 

आपल्‍या मंत्रीपदाच्‍या कारकीर्दित त्‍यांनी लोकशाही विकेंद्रीकरण समितीचे अध्‍यक्ष म्‍हणूनही काम केले व महाराष्‍ट्रात पंचायती राज्‍याची मुहूर्तमेढ रोवली.

1962

सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्‍ट्र विधानसभेवर यवतमाळ जिल्‍हातील पुसद मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवड होऊन पुन्‍हा महसूल मंत्री म्‍हणून नियुक्‍ती आणि मुख्‍यमंत्री होईपर्यत हेच खाते त्‍यांच्‍याकडे राहिले.

5 डिसेंबर 1963

महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री झाले.

1964

युगोस्‍लाव्हियाचा दौरा.

1965

1 मे 1965 रोजी आंतर भारती, मुंबई (इंडियन एकॅडमी ऑफ लेटर्स) संस्‍थेचे उद्घाटन.

 

भारत-पाक संघर्ष सुरु होताच 9 ते 11 सप्‍टेंबरला मुंबईत स्‍फूर्तिदायक व मार्गदर्शक भाषणे दिली. त्‍यामुळे महाराष्‍ट्रात चैतन्‍यदायी वातावरण निर्माण झाले. नंतर काही महिने युध्‍द सज्‍जतेसाठी महाराष्‍ट्राचा दौरा केला.

 

शेती उत्‍पादनाच्‍या नव्‍या कार्यक्रमाचा प्रचार करण्‍यासाठी महाराष्‍ट्रातील 25 जिल्‍हांचा दौरा.

1966 

अवर्षणामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. संकटात सापडलेलया शेतकऱ्यांना हिंमत देण्‍यासाठी राज्‍यातील दुष्‍काळी जिल्‍हयांत झंझावती दौरा.

1967

सार्वत्रिक निवडणुकीच्‍या प्रभावी प्रचारासाठी महाराष्‍ट्रात दौरा. या निवडणुकीत महाराष्‍ट्र विधानसभेवर पुसद मतदारसंघातून चौथ्‍यांदा निवड होऊन 6 मार्च 1967 ला महाराष्‍ट्राच्‍या मुख्‍यमंत्री पदावर दुसऱ्यांदा एकमताने निवड.

 

महाराष्‍ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नाबाबत महाराष्‍ट्र विधानसभेत भाषण (17-11-1967)

1970 

अमेरिकी शासनाच्‍या निमंत्रणावरुन अमेरिकेचा दौरा व युरोपिय देशांना भेटी.

1972

सार्वत्रिक निवडणुकीच्‍या प्रचारासाठी महाराष्‍ट्रात दौरा. या सार्वत्रिक निवडणुकीतून पुसद मतदारसंघातून पाचव्‍यांदा निवड होऊन 14 मार्च 1972 ला महाराष्‍ट्राच्‍या मुख्‍यमंत्रीपदी तिसऱ्यांदा निवड झाली.

 

महाराष्‍ट्रात गंभीर स्‍वरुपाचा दुष्काळ पडला होता. राज्‍यातील नऊ जिल्‍हांतील दुष्‍काळ हा देशातील इतर कोणत्‍याही भागातील दुष्‍काळापेक्षा अधिक तीव्र स्‍वरुपाचा होता; प्रत्‍येक जिल्‍हयात फिरुन त्‍यांनी दुष्‍काळी कामाला जोराने चालना दिली.

20 फेब्रु 1975

महाराष्‍ट्राच्‍या मुख्‍यमंत्री पदाचा राजीनामा.

12 मार्च 1977

वाशिम लोकसभा मतदारसंघातून खासदार म्‍हणून निवड.

18 ऑगस्‍ट 1979

सिंगापुर येथे 66 व्‍या वर्षी निधन.


संदर्भ:
महानायक ग्रंथ- संपादन : मधुकर भावे
सामान्‍यांतील असामान्‍य- वसंतराव नाईक : लेखक. पंढरीनाथ पाटील

English Summary: Maharashtra Krishi Din
Published on: 01 July 2019, 07:59 IST