Maharashtra HSC Results: बारावीचा यंदाच्या वर्षीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा बारावीचा एकूण निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. त्यापैकी मुलींचा निकाल ९५.३५ टक्के लागला असून मुलांचा निकाल ९३. २९ टक्के लागला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने या निकालात बाजी मारली आहे. राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के इतका लागला आहे. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
४ मार्चपासून सुरु झालेल्या बारावीच्या परीक्षेला राज्यात एकूण १४ लाख ८५ हजार ८२६ इतके विद्यार्थी बसले होते. बारावीची परीक्षा ४ मार्च २०२२ ते ३० मार्च २०२२ या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती.
मेघराजा तू रुसला काय? पुन्हा तारीख बदलली, राज्यातील आगमन लांबलं
विभागवार निकाल खालीलप्रमाणे :
कोकण - 97.22 टक्के
पुणे - 93.61 टक्के
कोल्हापूर - 95.07 टक्के
अमरावती - 96.34 टक्के
नागपूर - 96.52 टक्के
लातूर - 95. 25 टक्के
मुंबई - 90.91 टक्के
नाशिक - 95.03 टक्के
औरंगाबाद - 94.97 टक्के
निकालात मुलींचीच बाजी
बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 95.35 टक्के लागणार आहे तर मुलांचा निकाल 93.29 टक्के लागला आहे. मुलांपेक्षा 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
Panjabrao Dakh: पंजाबरावांचा 2022 चा मान्सून अंदाज जाहीर; काय म्हणतायेत डख वाचा...
Published on: 08 June 2022, 12:35 IST