Others News

आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात घेण्यात आलेली बहुमताची चाचणी शिंदे सरकारने जिंकली. दोन दिवसांचे अधिवेशन हे राज्यपालांच्या निर्देशानुसार बोलविण्यात आले होते. यातील पहिल्या दिवशी भाजपच्या राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला.

Updated on 04 July, 2022 7:35 PM IST

आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात घेण्यात आलेली बहुमताची चाचणी शिंदे सरकारने जिंकली. दोन दिवसांचे अधिवेशन हे राज्यपालांच्या निर्देशानुसार बोलविण्यात आले होते. यातील पहिल्या दिवशी  भाजपच्या राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज विश्‍वासदर्शक ठराव मांडण्यात आला.

त्यावेळी शिंदे गट आणि भाजप मिळून दोघांना 164 मध्ये तर महा विकास आघाडी ला 99 मते मिळाली. या विश्वास दर्शक ठरावामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणादरम्यान तीन मोठा घोषणा केल्या. त्या म्हणजे..

1- जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्यानंतर पंतप्रधान मोदींनी केंद्रीय कर कमी केला होता.

नक्की वाचा:बंडखोर म्हणत होते अजितदादा निधी देत नव्हते, दादांनी सगळ्यांसमोर आकडेवारीच सांगितली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आव्हान केले होते. त्यानंतर काही राज्यांनी पेट्रोलवरील व्हॅट कमी केला होता परंतु महाराष्ट्राने अद्याप पर्यंत कमी केला नव्हता त्यानुसार लवकरच कॅबिनेट बैठकीत पेट्रोल डिझेल स्वस्त करण्यासाठी निर्णय घेण्यात असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

नक्की वाचा:शिंदे सरकारचा मोठा निर्णय! लवकरच राज्यात पेट्रोल डिझेल होणार स्वस्त..

2- दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर सर्वात महत्त्वाचा घटक हा शेतकरी आहे. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सगळेच लोक शेतकऱ्याचे विचारपूस करतात

परंतु असे असताना शेतकऱ्यांच्या जीवनात सुखाचे क्षण यावेत म्हणून राज्य सरकार एवढे करेल की शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आम्हाला करायचा आहे यासाठी विरोधी पक्षाचे आणि सगळ्यांचे योगदान आणि सहकार्य आम्हाला लागेल.

त्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षाने हातात हात घालून काम करूयात असे आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी केले.

3- तसेच ज्या हिरकणी ने  रायगड वाचवा आणि इतिहास घडवला. हिरकणी गाव वाचवण्यासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे देखील एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

नक्की वाचा:ईकडे आड तिकडे विहीर", पिके तरतरली तर दुसरीकडे खतांच्या किंमती वाढल्या; सांगा शेती कशी करायची?

English Summary: maharashtra goverment three bid announcement today like as less vat in state
Published on: 04 July 2022, 07:33 IST