देशात मारुती सुझुकी (Maruti Suzuki) अग्रगण्य मोटोकॉर्प कंपन्यांपैकी एक आहे, ही कंपनी विशेषता फोर व्हीलर सेगमेंटमध्ये वाहन तयार करत आली आहे. भारतीय बाजारात MPV सेगमेंटमध्ये खूपच कमी फोर व्हीलर विक्रीसाठी उपलब्ध आहेत, असे असले तरी भारतातील अनेक अग्रगण्य मोटोकॉर्प कंपन्या या सेगमेंटमध्ये कारस लॉन्च करीत आहेत. या सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीची एरटिगा (Ertiga) ही कार लोकांच्या पसंतीस विशेष उतरली आहे. एर्टिगा गाडीचे Ertiga LXI (Petrol) ही सर्वात स्वस्त मॉडेल आहे, या सुरवाती मॉडेलची एक्स शोरूम किंमत ही 8.12 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.
मित्रांनो जर आपल्याकडे ही गाडी खरेदी करायची असेल परंतु एवढी मोठी रक्कम एकाच वेळी नसेल तर आपण ही गाडी 90000 रुपये डाउनपेमेंट भरून घरी घेऊन जाऊ शकता. उर्वरित रक्कम आपण बँकेमार्फत फायनान्स (Finance) करू शकता. मित्रांनो ही उर्वरित रक्कम आपण मासिक हप्ता (Monthly Installment) द्वारे फेडू शकता. याकरता कोटी बँक आपल्याकडून 9.5% दराने व्याज दर वसूल करेल. कारच्या या व्हेरीयंटला (Ertiga LXI पेट्रोल), आपण 90 हजार डाउनपेमेंट भरून घरी घेऊन जाऊ शकता अर्थात 8,08,089 चे कर्ज घेऊ आपण या गाडीसाठी घेऊ शकता.
या कर्जाची आपल्याला 5 वर्षांत परतफेड करण्याची कालावधी देण्यात येते. 5 वर्षामध्ये म्हणजेच 60 महिन्यांत 9.8 च्या दराने 10,25,400 रुपये आपणांस भरावे लागतील. साहजिकच 5 वर्षात तुम्हाला एकूण 2,17,311 रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत. पुढील 5 वर्षांसाठी, तुम्हाला दरमहा 17,090 रुपये EMI म्हणून भरावे लागतील. आम्ही नमूद केलेली माहिती ही ऑनलाइन इएमआय कॅल्क्युलेटर (Online EMI Calculator) वरून घेतली आहे.
जर आपणास मारुती सुझुकी कंपनीची एर्टिगा (Ertiga of Maruti Suzuki Company) गाडी विकत घ्यायची असेल तर आपण आपल्या जवळच्या डीलरशिप संपर्क साधून या गाडीवर सुरू असलेल्या फायनान्स ऑफर विषयी चौकशी करू शकता. आम्ही आपणास येथे सांगितलेल्या अंदाजात अल्पशा प्रमाणात चढ-उतार बघायला मिळू शकतो. यासाठी आपण आपल्या जवळच्या डीलरशी संपर्क साधणे आणि वारे राहणार आहे.
Published on: 02 March 2022, 10:48 IST