LPG Gas Cylinder Price Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी ग्राहकांना खुशखबर दिली आहे. १ मे रोजी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत ही कपात सरकारी तेल कंपन्यांनी (OMCs) केली आहे. यासोबतच जेट फ्लूटच्या किमतीतही कपात करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी आज 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 172 रुपयांनी कपात केली आहे.
नवे दर १ मेपासून लागू करण्यात आले
तेल कंपन्यांनी जेट इंधनाच्या किंमतीत 2415 रुपयांपर्यंत कपात केली आहे. १ मेपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
दिल्लीत पूर्वी 2028 रुपयांना व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध होता, आता तो 1856.50 रुपयांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे, कोलकातामध्ये 2132 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता 1960.50 रुपयांना मिळणार आहे.
आपला शेतकरी जगात भारी! पिकवली चक्क पांढऱ्या रंगाची जांभळं, असं केलं नियोजन
मुंबई आणि चेन्नईचे दर
मुंबईबद्दल बोलायचे झाले तर आधी हा सिलेंडर 1980 रुपयांचा होता, तो आता 1808.50 रुपयांवर आला आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये 2192.50 रुपयांच्या सिलेंडरसाठी आता 2021.50 रुपये मोजावे लागतील.
तेल विपणन कंपन्यांकडून एटीएफची किंमत 2415.25 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. गर्दीच्या प्रवासाच्या हंगामात किमती कमी झाल्यामुळे विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात विमान भाड्यात कपात होण्याची शक्यता आहे.
तरुणांनी तृणधान्य शेतीकडे वळावे, स्टार्टअपसाठीही पुढाकार घ्यावा : राज्यपाल रमेश बैस
नवीनतम एटीएफ किंमती
ATF ची किंमत दिल्लीत 95935.34 रुपये प्रति किलोलीटर, मुंबईत 89348.60 रुपये प्रति किलोलीटर, कोलकातामध्ये 102596.20 रुपये आणि चेन्नईमध्ये 99828.54 रुपये प्रति किलोलीटरवर आली आहे.
Published on: 01 May 2023, 08:52 IST