LPG Gas Price Hike: वाढत्या महागाईने (Inflation) होरपळणाऱ्या जनतेला मोठा झटका बसला आहे. घरगुती सिलिंडरच्या (LPG Cylender) किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडर दराने एक हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
आजपासून देशांतर्गत 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इंधन कंपन्यांनी घरगुती गॅसच्या दरात 50 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडर दराने एक हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
Rain Update: "काय तो पाऊस, काय ते पाणी, काय ते रस्ते"; मुंबई तुंबली...
मुंबईत आता घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1052.50 रुपये मोजावे लागणार आहेत. भारतामधील तेल कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्यानंतर आज पुन्हा सर्वसामान्यांना दरवाढीचा चटका दिला आहे. आज घरगुती गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. आजपासूनच ही दरवाढ लागू होणार आहे.
Almond Benifits: बदाम आहे आरोग्यासाठी रामबाण, रोज 6 बदाम खाल्ल्याने होतात हे फायदे
नवीन दरांच्या घोषणेनंतर किती पैसे मोजावे लागणार
14.2 किलोच्या सिलिंडरसाठी (प्रति सिलेंडर)
दिल्लीमध्ये 1,053 रुपये
कोलकाता 1,079 रुपये
मुंबई 1,052 रुपये
चेन्नई 1,068 रुपये मोजावे लागणार आहेत.
19 किलोग्रॅम सिलिंडरसाठी (प्रति सिलेंडर)
दिल्लीकरांना 2,012 रुपये
कोलकातामध्ये 2,132 रुपये
मुंबईत 1,972 रुपये
चेन्नईकरांना रु. 2,177 मोजावे लागणार आहेत.
रेड, ऑरेंज, यलो आणि ग्रीन अलर्ट म्हणजे नेमकं काय? ते कधी जारी केले जातात? जाणून घ्या सविस्तर
Published on: 06 July 2022, 10:06 IST