Others News

LPG Cylinder: 500 रुपयांत LPG गॅस सिलेंडर देणार असल्याची मोठी घोषणा अशोक गेहलोत यांनी सोमवारी केली आहे. राजस्थान सरकार दारिद्र्यरेषेखालील (BPL) आणि उज्ज्वला योजनेत नाव नोंदवलेल्या नागरिकांना 500 रुपयांत एलपीजी सिलिंडर (LPG Gas Cylinder) देणार असल्याची मोठी घोषणा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे.

Updated on 20 December, 2022 2:13 PM IST

LPG Cylinder: 500 रुपयांत LPG गॅस सिलेंडर देणार असल्याची मोठी घोषणा अशोक गेहलोत यांनी सोमवारी केली आहे. राजस्थान सरकार दारिद्र्यरेषेखालील (BPL) आणि उज्ज्वला योजनेत नाव नोंदवलेल्या नागरिकांना 500 रुपयांत एलपीजी सिलिंडर (LPG Gas Cylinder) देणार असल्याची मोठी घोषणा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे.

दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना वर्षभरात 12 सिलेंडर मिळणार असल्याचं सांगितलं आहे. यासोबतच नागरिकांना 'रसोई किट'मध्ये स्वयंपाकघरातील सामानही देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा गेहलोत यांनी केली आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते.

मुख्यमंत्री गेहलोत यांनी घोषणा करत सांगितलं आहे की, ही नवीन योजना 1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात येईल. राजस्थानच्या जनतेला महागाईच्या संकटातून बाहेर करण्याचा हा प्रयत्न आहे. यासाठी सरकार नवीन योजना सुरु करणार आहे.

शोभिवंत मत्स्य संवर्धनात जिवंत खाद्याचे महत्त्व

या नव्या योजने अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (BPL) आणि उज्ज्वला योजनेतील नागरिकांना 500 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्यात येईल. या योजनेअंतर्गत वर्षाला 12 सिलेंडर दिले जातील. सरकारचं लक्ष्य गरीब आणि गरजू लोकांना योजनांमध्ये पूर्णपणे सामावून घेऊन त्यांना अधिक लाभ देणे हा आहे.

PF Balance: नवीन वर्षाच्या आधी EPFO ​​ने जारी केला अलर्ट! आता...

English Summary: LPG Cylinder: Gas cylinder will be available for 500 rupees
Published on: 20 December 2022, 02:13 IST