पुणे: श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 वे वंशज शिवाजीराजे भोसले यांचं वृद्धपकालाने निधन झालं आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये त्यांनी अखरेचा श्वास घेतला.
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा जन्म 23 एप्रिल 1947 रोजी साली झाला. साहित्य,कला,क्रीडा,सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात त्यांचे भरीव योगदान होतं. साताऱ्यातील दोन्ही राजेंच्या मनोमिलनाचे शिल्पकार ते आहेत.
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सलग सहा वर्ष सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द गाजवली. 15 मे 1985 ते 16 डिसेंबर 1991 पर्यंत ते सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते.
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन, राजघराण्यावर शोककळा
शिवाजीराजे भोसले हे स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांचे भाऊ होते. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे ते काका होते.
ज्यावेळी उदयनराजे आणि शिंवेद्रराजे यांच्यातील वाद टोकाला गेल्यावर त्यांनी वडिलकीच्या नात्यानं अनेकवेळा दोघांचं मनोमिलन केलं होतं. त्यामुळे त्यांच्या जाण्याने राजघराण्यावर आणि साताऱ्यामध्ये शोककळा पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच्यावर उद्या गुरुवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.
शिवाजीराजे भोसले यांचे पार्थिव रात्री उशिरा अदालत वाडा येथे आणलं जाणार आहे त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. शिवाजीराजे यांची शांत आणि संयमी व्यक्तिमत्व अशी ओळख होती.
Published on: 13 September 2022, 10:01 IST