Others News

लाइफ इन्शुरन्स कार्पोरेशन अर्थात एलआयसीने 14 जून 2022 रोजी त्याच्या हमी फायदा सह एक विशेष पॉलिसी लॉन्च केली आहे. या पॉलिसी चे नाव धनसंचय योजना असे असून नॉन लींक्ड, नॉन पार्टीसिपटिंग, बचती सोबत जीवन विमा योजना इत्यादी महत्त्वाची वैशिष्ट्ये या धनसंचय योजनेचे आहेत.

Updated on 15 June, 2022 3:54 PM IST

 लाइफ इन्शुरन्स कार्पोरेशन अर्थात एलआयसीने 14 जून 2022 रोजी त्याच्या हमी फायदा सह एक विशेष पॉलिसी लॉन्च केली आहे. या पॉलिसी चे नाव धनसंचय योजना असे असून नॉन लींक्ड, नॉन पार्टीसिपटिंग, बचती सोबत जीवन विमा योजना इत्यादी महत्त्वाची वैशिष्ट्ये या धनसंचय योजनेचे आहेत.

 योजना सुरक्षितता तसेच बचतीचीसुविधा उपलब्ध करून देते.ही मुदतपृतीच्या तारखेपासून पे आउट कालावधीदरम्यान हमी उत्पन्न लाभ आणि हमी उत्पन्न लाभाच्या शेवटच्या हप्तासह हमी टर्मिनल लाभ प्रदान करते.

नक्की वाचा:Post Office Scheme: पोस्ट ऑफिस मध्ये 1 लाख गुंतवा आणि 1 कोटी मिळवा; कसं ते जाणुन घ्या

 या योजनेचा कालावधी आहे पाच ते पंधरा वर्ष

 एलआयसी धनसंचय योजना पाच वर्ष ते जास्तीत जास्त 15 वर्षांसाठी आहे. योजना तुम्हाला निश्चित उत्पन्नाचा लाभ देते त्यासोबतच उत्पन्नाचे फायदे, सिंगल प्रीमियम लेव्हल इन्कम बेनिफिट  आणि सिंगल प्लॅनची सुविधा यामध्ये वाढ होईल.

एलआयसी धनसंचय योजनेत कर्ज लेन सुविधा देखील उपलब्ध आहे.तुम्ही अतिरिक्त पैसे देऊन रायडर्स देखिल मिळवू शकतात.

 ही योजना पॉलिसी चालू ठेवत असताना विमाधारकाच्या दुखत मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत पुरवते तसेच पॉलिसी धारकाने निवडलेल्या पर्यायानुसार,मृत्यू लाभ एकरकमी किंवा पाच वर्षापर्यंत चा हप्ता म्हणून दिला जाईल.योजना कर्ज सुविधेद्वारे तरलतेच्या गरजेची देखील काळजी घेते.

नक्की वाचा:महिलांना भक्कम आर्थिक आधार देईल एलआयसीची 'ही' उपयुक्त पॉलिसी, वाचा सविस्तर माहिती

 एलआयसी धनसंचय योजनेत या चार योजना केल्या आहेत ऑफर

 एलआयसी धनसंचय योजनेच्या माध्यमातून एकूण चार प्रकारचे प्लॅन सादर करण्यात आले आहेत.  त्यानुसार ए आणि बी योजनेअंतर्गत रुपये 3 लाख 30 हजार चा सम विमा योजना ऑफर केली जाईल.

तसेच प्लॅन सी अंतर्गत दोन लाख पन्नास हजार रुपयांच्या किमान विमा संरक्षण दिले जाईल. त्याचप्रमाणे प्लॅन डी अंतर्गत 2 लाख 20 हजारांचे विमा संरक्षण मिळेल. या योजनेसाठी कमाल प्रीमियम मर्यादा निश्चित केलेले नाही. या योजनेसाठी किमान वय तीन वर्षे आहे.

नक्की वाचा:पती-पत्नी दोघांसाठी उपयुक्त योजना! एकदाच भरा पैसे, मिळवा 12 हजार रुपये दरमहा पेन्शन

English Summary: life insurance carporation lonch dhan sanchay yojna for invester
Published on: 15 June 2022, 03:54 IST