Others News

लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन असतात एलआयसी एक कमीत कमी गुंतवणुकीतून जास्त परतावा देणाऱ्या पर्याय उपलब्ध करून देत असते. एलआयसीचे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे प्लान आहेत आणि प्रत्येक प्लानचे वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत.

Updated on 11 June, 2022 9:23 PM IST

लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन असतात एलआयसी एक कमीत कमी गुंतवणुकीतून जास्त परतावा देणाऱ्या पर्याय उपलब्ध करून देत असते. एलआयसीचे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे प्लान आहेत आणि प्रत्येक प्लानचे वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत.

या लेखामध्ये आपण  जे व्यक्ती कमीत कमी गुंतवणुकीतून जास्त परतावा मिळावा अशा पद्धतीचा एखादा पर्याय शोधत असतील तर एलआयसीची जीवन उमंग पॉलिसी त्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये तुम्हाला वार्षिक पैसे मिळतातच परंतु मॅच्युरिटी बेनिफिट देखील चांगले मिळतात.

जर तुम्ही एका महिन्यात चौदाशे रुपये जमा करत गेलात तर 25 लाख रुपये तुम्हाला मिळतात. म्हणजे जर तुम्ही या पॉलिसीमध्ये दर दिवशी 47 रुपयांची बचत करून गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटी वर 25 लाख रुपये मिळतील.

नक्की वाचा:200 रुपये गुंतवणूक करा, 30 वर्षानंतर मिळणार तब्बल 2 कोटी; वाचा सविस्तर

 एलआयसीची जीवन उमंग पॉलिसी

 एलआयसीची ही योजना तुमच्या कुटुंबाला उत्पन्न आणि सुरक्षा देते. या योजनेत वार्षिक सर्वायवल बेनिफिट उपलब्ध आहे. पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर प्रिमियम भरल्यापासून ते प्रीमियम पेमेंट संपेपर्यंत आणि नंतर मॅच्युरिटी होईपर्यंत फायदे मिळतात.

योजना मुदतपूर्ती नंतर प्रीमियम भरण्याची मुदत संपेपर्यंत वार्षिक लाभ प्रदान करते. समजा तुम्ही वयाच्या 26 व्या वर्षी साडेचार लाख रुपयांचा विमा संरक्षणासाठी जीवन विमा पॉलिसी घेतली तर तुम्हाला प्रति महिना तेराशे पन्नास रुपये भरावे लागतील. जे दररोज अंदाजे 45 रुपये आहे.

तर अशाप्रकारे तुम्ही एका वर्षात तुमचा प्रीमियम पंधरा हजार 882 रुपये असेल आणि तीस वर्षांमध्ये तुमचा प्रीमियम 476460 रुपये होईल. तुम्ही तुमचे प्रीमियम तीस वर्ष कोणत्याही अडथळ्याशिवाय भरल्यास एकविसाव्या वर्षी तुमच्या गुंतवणूकीवर एलआयसी ला वार्षिक 36 हजार रुपयांचा परतावा घेत राहिला तर तुम्हाला सुमारे 36 लाख रुपये मिळतील.

एलआयसी जीवन उमंग पॉलिसीचे फायदे

 पॉलिसी घेतल्यानंतर इन्कम टॅक्स ऍक्ट 80c अंतर्गत टॅक्समधून सवलत मिळते. एलआयसी जीवन उमंग पॉलिसी च्या माध्यमातून बेसिक विमा राशी दोन लाख रुपये आहे. जर पॉलिसी धारकाचा मृत्यु शंभर वर्ष वयाच्या अगोदर झाला तर वारसाला एका वेळेस सगळा पैसा मिळतो.

नक्की वाचा:उत्तम व्यावसायिक कल्पना! गाय-म्हशीच्या शेणापासून सुरु करा उत्तम व्यवसाय, होईल दुप्पट नफा

नक्की वाचा:प्रतिमहिना 1.50 रुपये प्रिमियम मध्ये मिळणार 2 लाख रुपयांचा विमा, केंद्र सरकारची ही योजना आहे फायदेशीर

English Summary: lics jivan umang policy is good option for investment
Published on: 11 June 2022, 09:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)