Others News

मागच्या वर्षी च्या कोरोना महामारी च्या काळापासून बऱ्याच प्रमाणात कॅशलेस व्यवहार करण्यामध्ये लोकांचा कल वाढलेला आहे. बरे लोकं ऑनलाइन आणि कॅशलेस व्यवहार करण्याला पसंती देत आहे. याबाबतीत भारतातील अग्रगण्य विमा कंपनी एल आय सी ने सुद्धा एक पाऊल पुढे टाकले आहे. एलआयसी मी डिजिटल आणि कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आयडीबीआय बँकेसोबत रूपे शगुन कार्ड सुरू केले आहे. हे कार्डचा उद्दिष्ट म्हणजे हे कार्ड गिफ्ट देण्याच्या कॅशलेस पद्धतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मार्केटमध्ये आणले जात आहे.

Updated on 22 June, 2021 10:43 AM IST

 या कार्डचा उपयोग असा होतो की, या कारच्या माध्यमातून पाचशे ते दहा हजार रुपयांपर्यंतची रक्कम देता येते. त्याचबरोबर टेलिफोन, मोबाईल आणि वीज बिल भरण्यासाठी देखील आणि ऑनलाइन शॉपिंग साठी ही या कार्डचा वापर सहजपणे करता येतो या कार्ड द्वारे  व्यवहार करताना तो पाचशे ते दहा हजार रुपये दरम्यान असावा व त्याची वैधता तीन वर्ष आहे. या कार्डचा वापर देशभरातील लाखो व्यापारी दुकाने तसेच ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या ई-कॉमर्स वेबसाईटवर देखील करता येतो.

 कार्ड विषयी महत्त्वाचे

  • हे एक कॉन्टॅक्ट लेस कार्ड असल्याने कार्डधारकांना पाच हजार रुपयांपर्यंतच्या खरेदीसाठी तुमचा पर्सनल पिन टाकण्याची गरज भासणार नाही.
  • या काढला सर्वत्र स्वीकारले जाते अशा परिस्थितीत शभुं गिफ्ट कार्ड देशातील सर्व व्यापारी दुकानांमध्ये तसेच ई-कॉमर्स वेबसाइट वर देखील वापरता येते.
  • हे कार्ड एखाद्याला गिफ्ट म्हणून देखील दिले जाऊ शकते तसेच या कार्डच्या माध्यमातून डिपार्टमेंटल स्टोअर्स, ज्वेलरी स्टोअर्स, युटिलिटी बिले, विमान, रेल्वे, बस इत्यादींच्या तिकीट बुकिंग साठी सुद्धा वापरू शकतात.
  • शगुन कार्ड ला एम पासबुक मोबाईल ॲप्स ला सहज  जोडले जाऊ शकते. या ॲपद्वारे ग्राहक त्यांच्या  संपुर्ण व्यवहाराची नोंद तपासू शकतात. तसेच कार्ड शिल्लक प्रवेश करण्यासाठी रियल टाइम एक्सेस इत्यादी  तपासू शकता.

हे कार्ड केव्हा आणि कसे मिळते?

 सुरुवातीला हे प्रीपेड कार्ड एलआयसी आणि त्यांच्या सहाय्यक घटकांद्वारे अंतर्गत वापरासाठी उपलब्ध केली जात आहेत. सोबतीला याचा उपयोग अधिकृत कार्यक्रमादरम्यान कर्मचाऱ्यांना पुरस्कृत करण्यासाठी केला जाईल.

एलआयसी च्या मते हे पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर हे शगुन रूपे कार्ड सर्वसामान्यांनाही उपलब्ध होईल. कंपनीचे म्हणणे आहे की हे कार्ड एलआयसी आणि त्याच्या सहाय्यक  कंपन्यांना अधिकृत वापरासाठी उपलब्ध असेल. नंतर हे डिजिटल प्लेटफार्म द्वारे सामान्य वापरासाठी देखील वापरले जाईल. या कार्डसाठी एलआयसी ग्राहक अर्ज करू शकतील आणि त्यांना हे कार्ड दिले जाईल.

 माहिती स्त्रोत-z 24 taas

English Summary: lic shagun gift card
Published on: 22 June 2021, 10:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)