एलआयसीची एक विमा क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य कंपनी आहे. ही कंपनी विविध योजनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या योजना राबवत असते. एलआयसीची अशीच एक महत्त्वाची योजना आहे लहान मुलांसाठी खास बनवण्यात आली आहे. या योजनेबद्दल या लेखात आपण माहिती घेणार आहोत.
एलआयसीची चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन
सध्याच्या काळात बचतीबरोबरच गुंतवणूक देखील महत्त्वाचे असते. अशा वेळी गुंतवणूक करण्यासाठी देशात यायला अधिक पसंती दिली जाते. सरकार द्वारा संचालित या कंपनीतील पॉलिसीमध्ये ग्राहकांचे गुंतवणुकीवर अनेक प्रकारचे फायदे आहेत. एल आय सी पॉलिसी मध्ये गुंतवणूक करणे एक चांगला पर्याय ठरू शकतो. मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी देखील काही विशेष योजना एलआयसी कडून देण्यात येतात. त्यातीलच लहान मुलांसाठी एक महत्त्वाची योजना म्हणजे एलआयसी ची न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लान ही होय.
या योजनेचे वैशिष्ट्य
- ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा शून्य वर्षे आहे.
- ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी मुलाचे वय जास्तीत जास्त 12 वर्ष असावे.
- या पॉलिसीत प्रीमियम वेअर बेनिफिट रायडर हा पर्याय उपलब्ध आहे.
- पॉलिसीधारकाला अठरा, 20 आणि 22 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर सम अशुरड ची 20 टक्के रक्कम मिळते
मॅच्युरिटी बेनिफिट
पॉलिसीच्या मॅच्युरिटी वेळी ( विमाधारकाच्या पॉलिसीच्या कालावधी दरम्यान मृत्यू न झाल्यास ) पॉलिसीधारकाला विम्याच्या रकमेची उर्वरित 40 टक्के बोनस सहित मिळते.
डेट बेनिफिट
पॉलिसी कालावधीदरम्यान पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास अंतिम अतिरिक्त बोनस दिला जाईल. विशेष म्हणजे एकूण पेमेंटच्या 105 टक्के डेट बेनिफिट मिळतो.
तसेच ही पॉलिसीमुलांच्या शिक्षणासाठी अत्यंत फायद्याची ठरू शकते. मुलांच्या महाविद्यालयीन किंवा उच्च शिक्षणा वेळी या पॉलिसी तुन बेनिफिट मिळतो.
Published on: 25 July 2021, 08:09 IST