भारतीय जीवन विमा महामंडळाने आरोग्यरक्षक या नव्या आरोग्य स्वास्थ्य योजनेचा शुभारंभ केला आहे. ही योजना गैर लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग, नियमित प्रीमियम, व्यक्तिगत स्वास्थ्यविमा असलेली आहे. ही योजना काही निश्चित स्वास्थ्य संकटकाळी लाभ देणारी आहे. आरोग्य संबंधी संकटाच्या वेळीही मदत करून विमाधारकाला आणि त्याच्या कुटुंबाला कठीण वेळीआर्थिक रूपाने कवच प्रदान करू शकते.एक व्यक्ती एक पॉलिसी याअंतर्गत स्वतः विमाधारक,आपला जीवनसाथी, आपली मुले आणि आई-वडिलांना सुरक्षा मिळते. या लेखात या योजनेविषयी माहिती घेऊ.
या योजनेची वैशिष्ट्ये
या योजनेअंतर्गत विमाधारक व्यक्तीचे वय 18 ते 65 वर्ष असावे. मुलांचे वय 91 दिवसांपासून वीस वर्षे वयासाठी उपलब्ध आहे. गार्डियनसाठी याचे कव्हर पिरेड 80 वर्षाच्या वयापर्यंतआणि मुलांसाठी 25 वर्षांपर्यंत साठी आहे.
या योजने अंतर्गत मिळणारे फायदे
1-ही पॉलिसी जर तुम्हाला निवडायचे असेल तर फ्लेक्सबल कालावधी दिला गेला आहे.
यामध्ये प्रीमियम पेमेंटचा पर्याय हा सोपा आणि सुविधा जनक आहे.
3- दवाखान्यात भरती होणे किंवा ऑपरेशन इत्यादी प्रकरणात व्हॅल्युएबल फायनान्शिअल प्रोटेक्शन आहे.
4- वास्तविक वैद्यकीय खर्चावर लक्ष दिल्याशिवाय एकरकमी लाभ
5- ऑटो स्टेप ऑफ बेनिफिट आणि नो क्लेम बेनिफिट च्या माध्यमातून हेल्थ कवर वाढवणे.
6- जर एका पेक्षा जास्त सदस्य एखाद्या पॉलिसी अंतर्गत येतात तर मुळ विमा घेणारी व्यक्ती अर्थात पोलीस धारकाचा इन्शुर्ड वेळी दुर्दैवी मृत्यू च्या बाबतीत इतर विमीत व्यक्तींसाठी प्रीमियम सुटचे धोरण
7
-अंबूलस लाभ मिळतो.
8-आरोग्य तपासणीचा फायदाही मिळतो.
9- काही प्रमुख सर्जिकल लाभांसाठी कॅटेगरी एक व कॅटेगरी 2 च्या अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही विमित सर्जरीच्या स्थितीत एक वर्षासाठी प्रीमियम सुट लाभ
भारतीय जीवन विमा महामंडळाने ही योजना विविध फायदे यांसह 19 जुलै पासून लोकांच्या सेवेत सादर केली आहे.
Published on: 20 July 2021, 12:38 IST