Others News

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेडअर्थात एलआयसी भारतातीलविमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. एलआयसी नेहमी वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींसाठी नवनव्या पॉलिसी बाजारात आणत असते.एलआयसीची अशीच एक योजना फक्त महिलांसाठीआणली गेली आहे. या योजनेचे नाव आहे आधार शिला योजना या योजनेबद्दल या लेखात जाणून घेऊ.

Updated on 14 September, 2021 11:01 AM IST

 लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेडअर्थात  एलआयसी भारतातीलविमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. एलआयसी नेहमी वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींसाठी नवनव्या  पॉलिसी बाजारात आणत असते.एलआयसीची अशीच एक योजना फक्त महिलांसाठीआणली गेली आहे. या योजनेचे नाव आहे आधार शिला योजना या योजनेबद्दल या लेखात जाणून घेऊ.

 एलआयसीची आधाशीला योजना

 एलआयसी आधार शिला योजना ही फक्त महिलांसाठी आणली आहे.या योजनेचे ग्राहक फक्त महिला असणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून एलआयसी ग्राहकांना सामाजिक सुरक्षा आणि बचत प्रदान करणार आहे. या योजनेद्वारे पॉलिसीधारक मॅच्युअर झाल्यानंतर पैसे मिळतील तसेच एलआयसी योजना पॉलिसीधारक आणि मृत्यू नंतर कुटुंबाला मदत करण्यासाठी आर्थिक पाठबळही या योजनेच्या माध्यमातून मिळते.

 या योजनेची रचना

 आधार शिला पॉलिसी ची किमान मुदत दहा वर्ष आणि जास्तीत जास्त वीस वर्ष मदत आहे. मॅच्युरिटी वयजास्तीत जास्त 70 वर्षे आहे.  या योजनेसाठी ची विमा रक्कम जास्तीत जास्त 75 हजार रुपये आणि कमाल विमा रक्कम तीन लाख रुपये आहे या योजनेत योग्य नियोजनाने तुम्ही 20 वर्षासाठी 29 रुपये दररोज सेविंग करून चार लाख रुपये जमा करू शकता. पहिल्या वर्षात तुम्हाला  4.5टक्के करासह दहा हजार 959 रुपये जमा करावी लागतील.त्याच्या पुढच्या वर्षी तुम्हाला दहा हजार 723 रुपये भरावे लागतील.अशा पद्धतीचा वापर करून तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक आधारावर प्रीमियम जमा करू शकता. अशा पद्धतीने प्रीमियम भरल्याने वीस वर्षात तुम्हाला दोन लाख 14 हजार 696 रुपये जमा करावे लागतील जे मॅच्युरिटी च्या वेळी तीन लाख 97 हजार रुपये होतील.

 आधार शिला योजनेची वैशिष्ट्ये

  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही योजना फक्त महिलांसाठी आहे.
  • या योजनेत ऑटो कवर सुविधा उपलब्ध आहे.
  • ही लो प्रीमियम योजना आहे.
  • पॉलिसी लाभार्थ्यांना अतिरिक्त पेमेंट म्हणून लॉयल्टी ऍडीशन मिळेल आणि सर पॉलिसीधारकाला पाच वर्षानंतर मृत्यू झाला तर हे सरासरी विमा पॉलिसी च्या विरोधाभास आहे जे फक्त मूलभूत विमा रकमेच्या बरोबरीचे आहे.
  • ह्या पॉलिसीत गंभीर आजार समाविष्ट नाही.
  • पॉलिसीचे तीन वर्षे पूर्ण केल्यानंतरया योजनेत कर्जाची सुविधा उपलब्ध आहे.
  • एलआयसी या पॉलिसीसाठी ॲक्सिडेंटल राईडरहानी परमनंट डिसेबिलिटी रायडर्सचीदेखभाल करते.
  • या पॉलिसी चे भरलेले प्रीमियम हे कलम 80 सी अंतर्गतआयकर मुक्त  आहेत.
  • तसेच कलम 10(10 डी)अंतर्गत परिपक्वता रक्कम करमुक्त आहे.
  • पहिल्या पाच वर्षाच्या आत मृत्यू झाल्यास, मूळ विमा रकमेच्या 110 टक्के इतका दावा असेल.
English Summary: LIC adharshila policy for women most benefit
Published on: 14 September 2021, 11:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)