लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात एलआयसी ही समाजातील सर्वच घटकांसाठी वेगवेगळे गुंतवणूक योजना आणि आर्थिक सुरक्षा देण्यासाठी विविध प्रकारचे प्लान आणते.
आपल्याला माहित आहेच की, एलआयसी एक गुंतवणुकीच्या बाबतीत एक विश्वासाचे नाव असून कायमच आकर्षक पॉलिसी प्लान च्या माध्यमातून व्यक्तींचे आर्थिक भविष्य सुरक्षित करीत असते.
अशीच एक महत्त्वाची एलआयसी ची योजना आहे. योजना सुरक्षा आणि बचत दोन्ही देते. या एलआयसीच्या महत्त्वाच्या योजनेबद्दल या लेखात माहिती घेऊ.
एलआयसीची आधारशिला योजना
ही योजना भारतातील ज्या महिलांचे आधार कार्ड बनले आहे अशा महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. एल आय सी ची ही योजना पॉलिसीधारक आणि त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक मदत करते.
या पॉलिसीच्या मॅच्युरिटी वर पॉलिसीधारकाला पैसे मिळतात. या योजनेच्या माध्यमातून, मूळ विमा रक्कम किमान 75 हजार आणि कमाल तीन लाख रुपये आहे.
आधारशिला योजनेचा कालावधी कमीत कमी दहा वर्ष आणि जास्तीत जास्त वीस वर्षांपर्यंत असून आठ ते 55 वर्षे वयोगटातील महिला एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
या योजनेचा परिपक्वता वय 70 वर्षे आहे. तुम्हाला या योजनेचा प्रीमियम मासिक,तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर भरता येतो.
नक्की वाचा:पती-पत्नी दोघांसाठी उपयुक्त योजना! एकदाच भरा पैसे, मिळवा 12 हजार रुपये दरमहा पेन्शन
उदाहरणासहित या पॉलिसीचा प्लान समजून घेऊ
उदाहरणार्थ तुम्हचे वय 31 वर्षे आहे आणि तुम्हाला वीस वर्षांसाठी दररोज 230 रुपये जमा केले तर पहिल्या वर्षी तुम्हाला दहा हजार 959 रुपये मिळतील.
यावर साडेचार टक्के कर लागणार आहे. पुढील वर्षी तुम्हाला दहा हजार 723 रुपये द्यावे लागतील. हे तुम्ही मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक बेस वर जमा करु शकतात.
अशा प्रकारे तुम्हाला वीस वर्षांमध्ये दोन लाख 14 हजार 696 रुपये जमा करावे लागतील आणि मॅच्युरिटी च्या वेळी तीन लाख 97 हजार रुपये तुम्हाला मिळतील.
नक्की वाचा:LIC Policy:दररोज भरा 45 रुपये आणि प्रतिवर्षी मिळवा 36 हजार रुपये, वाचा सविस्तर माहिती
नक्की वाचा:सुकन्या योजनेत मोठे बदल! तुमच्यावर खात्यावर होईल थेट परिणाम
Published on: 14 June 2022, 11:38 IST