Others News

अपघातग्रस्त शेतकर्याआस किंवा त्याच्या कुटुंबास आर्थिक मदतीसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आहे.

Updated on 26 April, 2022 1:23 PM IST

राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, हे अपघात झाल्यावर अनेक शेतकर्यांना आपला जीव गमवावा लागला आहे तसेच काही शेतकर्यांना अपंगत्व आले आहे. अश्या अपघातामुळे शेतकरी घरातील कर्त्या पुरुषावर ओढवलेल्या संकटामुळे त्या व्यक्तीच्या परिवाराचे जीवन विस्कळीत झाल्याशिवाय राहत नाही.

घरातील प्रमुख व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होतो. अशा अपघातग्रस्त शेतकर्‍यास किंवा त्याच्या कुटुंबास आर्थिक मदतीसाठी शासनाने राज्यात शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा सन २००५-०६ पासून कार्यान्वित केली होती. सदर योजनेत आता बदल करण्यात आले असून योजनेचे नाव व मिळणाऱ्या रकमेत बदल करण्यात आला आहे.

सन २००९-१० पासून या योजनेचे नाव बदलून शेतकरी जनता अपघात विमा योजना असे करण्यात आले. ही विमा योजना रु.१.०० लाख इतक्या विमा सुरक्षेसह राबविण्यात येत होती. परंतु, २०१४ साली गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले व महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले, गोपीनाथ मुंडे यांचे ग्रामीण भागात आणि विशेष करून शेतकऱ्यांसाठी मोठे योगदान होते, त्यामुळे या योजनेचे नाव २०१५-१६ ला बदलून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात वीमा योजना असे नाव करण्यात आले आहे.

सदर योजनेनुसार विमा सुरक्षेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढवून रुपये २.०० लाख ठरविण्यात आली आहे. त्यामुळे अपघातामुळे मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकर्यांना दोन लाख रुपयापर्यंत शासनातर्फे अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी कृषी विभागाकडून सहाय्य करण्यात येते. 

शेतकरी किंवा त्यांच्या वारसदारांनी समस्या असल्यास तालुका संबंधित भागातील कृषी अधिकाऱ्यांशी किंवा तालुका कृषी अधिकार्यांकडे संपर्क साधावा. यापूर्वी शेतकर्‍यांनी अथवा त्यांच्यावतीने अन्य कोणत्याही संस्थेने कोणतीही वेगळी विमा योजना लागू केली असल्यास अथवा विमा उतरवला असल्यास त्याचा या योजनेशी संबंध नाही असे स्पष्ट करण्यात आले असून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणारे लाभही स्वतंत्र असतील असेही शासनाने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या
तर ऊस उत्पादकांना आत्महत्या करण्याची वेळ येईल! नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य
शेतकऱ्यांनो पिटाया फळाची लागवड ठरतीये फायदेशीर, अनेकांनी केली लाखोंमध्ये कमाई..

English Summary: Let's find out what is Gopinath Munde Farmers Accident Insurance Scheme
Published on: 26 April 2022, 01:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)