राज्यात शेतकऱ्यांसह विविध प्रश्न प्रलंबित आणि महत्वाचे असताना महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा दोन पक्षांच्या प्रतिनिधींमध्ये बिबट्या सफारीवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिबट्या सफारी बारामतीला पळवली असा आरोप करत शिवसेनेच्या माजी खासदार, आमदार यांनी राज्यातील राजकारण चांगलेच तापवले. यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी थेट राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली तर माजी आमदार शरद सोनावणे यांनी उपोषण केले. यावर मुख्यमंत्र्याच्या सचिवांनी बिबट्या सफारी जुन्नर येथेच होणार, असे आश्वासन दिल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले. मात्र या प्रकारावर अजित पवारांनी स्पष्टीकरण देत जुन्नर बिबट सफारी बारामतीला घेऊन जात आहोत, हे धादांत खोटे असल्याचे सांगितले.
बारामतीचा बिबट्या सफारी प्रकल्प आणि जुन्नरचा प्रकल्प पूर्णतः वेगळा आहे. बारामतीचा प्रकल्प २०१६ साली मंजूर झाला असल्याने या प्रकल्पावर राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याचे पवार म्हणाले. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे असून जुन्नरमध्ये परीक्षण करून बिबट्या सफारीसाठी जागा निश्चित करण्याचे काम सुरु आहे. वनविभागाचे अधिकारी योग्य जागा पाहण्याचे काम करत आहेत.
त्यावर संबंधित अधिकारी पुढील आठवड्यात निर्णय घेतील असे अजित पवार म्हणाले. शिवाय खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अतुल बेनके हे त्या ठिकाणचे प्रतिनिधी असल्याने त्यांना विश्वासात घेऊन प्रकल्प तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यांनी पुणे जिल्हात सगळीकडे तुम्हीच आहात का? जुन्नर तालुक्यातील धरणाचे पाणी कर्जतला पळविता, तसेच नियोजित बिबट सफारी बारामतीला घेऊन जात आहात.
शिवसृष्टी बारामतीला पळवता आहात, मात्र जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला आता पळवुन नेऊ नका, अशा शब्दात या प्रकल्पावरून जोरदार टिका माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केली होती यावर अजित पवार यांनी हे स्पष्टीकरण दिले. यामुळे महाविकास आघाडीमध्येच चांगले वातावरण तापले आहे. आता पुढे काय होणार हे लवकरच समजेल.
महत्वाच्या बातम्या;
CNG GAS; अजितदादांनी करून दाखवलं!! राज्यात एप्रिलपासून सीएनजी गॅस होणार स्वस्त
कधी नव्हे ते पुणे जिल्हात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी, काय आहेत कारणे, वाचा...
महागाईचा भडका! आता गँस, पेट्रोल, डिझेलनंतर ८०० औषधांचे दर वाढणार
Published on: 26 March 2022, 04:34 IST