फणस हे फळ आकाराने फार मोठे असते. फणसाच्या आवरणाला चारखंड असे म्हणतात, चारखंडाला काट्यांसारखी अनेक टोके असतात. त्यामुळे फणस हा बाहेरून काटेरी खडबडीत असतो, फणसाच्या आतील भागात मधोमध काठीसारखा भाग असतो. त्याला पाव असे म्हणतात. त्यालाच अनेक गरे लागलेले असतात एका गऱ्यामध्ये एक बी असते. तिला आठोळी म्हणतात. फळाच्या शेवटच्या टोकाला आलेल्या गऱ्याला टेंबळी म्हणतात. छोट्या कच्च्या फणसाला कुइरी म्हणतात. कच्च्या फणसाची भाजी करतात.फणसाला किंवा त्याच्या झाडाला निचूळ असाही एक शब्द आहे.
फणसाचे दोन प्रमुख प्रकार आहेत.१ ) बरका - बरका ही फणसाची एक जात आहे. हा फणस हा अधिक मधुर आणि रसाळ असतो बरका फणस हा प्रामुख्याने कोकणात आढळून येतो, बरकाचे गरे काप्याच्या गरांपेक्षा जास्त चिकट असतात. कोकणात या प्रकारच्या फणसाचा रस काढून तो तांदळाच्या रव्यात मिसळून सांदणे हा गोड पदार्थ करतात.२ ) कापा - कापा ही फणसाची एक जात आहे. हा फणस हा बरक्या फणसापेक्षा कमी गोड आणि रसाळ असतो. कापा फणस हा प्रामुख्याने देशावर आढळून येतो. कापा फणस कापायला बरकापेक्षा थोडा सोपा असतो.
विलायती व अन्य फणस - फणसाच्या कापा आणि बरका याप्रमाणेच विलायती फणस हीसुद्धा एक जात आहे.या जातीचा फणस प्रामुख्याने भाजीसाठी वापरतात, सकल्या, नीर आणि डगूळ याही फणसाच्या जाती आहेत.लागवड - फणसाची लागवड महाराष्ट्रातील कोकण भागात होते. तसेच देशावर किंवा घाटावरही फणस आढळून येतात. फणसाचे झाड हे आकारमानाने मोठे असते. झाडाच्या बुंध्याला फणस लटकलेले असतात.फणसापासून तयार केले जाणारे पदार्थ - फणसाच्या साकट्याची भाजी,कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजसांजणे / सांदणे (फणस इडली)तळलेले गरे
फणसाची साठे (फणस पोळ्या)आठळ्यांची भाजीपावेची भाजीउकडलेल्या आठळ्याफणसाचे गरे खाल्यावर त्यावर विड्याचे पान खाऊ नये. तसे करणे हे विरुद्धाशन आहे फणस पिकल्यावर त्यांचा सुवास सर्वत्र पसरतो, फोडून आतील गरे खाण्यासाठी वापरतात.फणस पिकून मऊ झाल्यावर आतील गरे काढतात.या गांपासून पोळ्या, गऱ्यात तांदळाची कणी मिसळून सांदण करतात, ती ताजी खाण्यास चांगली लागतात. हिरव्या फणसाची भाजी करतात. कच्च्या फणसाचे गरे बारीक चिरून, खोबऱ्याच्या तेलात तळून त्याला तिखट, मीठ लावतात. हे खाण्यास कुरकुरीत व चविष्ट लागतात. काही ठिकाणी याच्या गऱ्यांपासून आईस्क्रीम बनवतात.
Published on: 05 July 2022, 01:17 IST