Others News

दरवर्षी 7 जून रोजी 'जागतिक अन्न सुरक्षा दिन' म्हणजेच (World Food Safety Day) जगभरात साजरा केला जातो.

Updated on 08 June, 2022 7:30 PM IST

दरवर्षी 7 जून रोजी 'जागतिक अन्न सुरक्षा दिन' म्हणजेच (World Food Safety Day) जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना अन्न सुरक्षेबाबत जागरूक करणे हा आहे. खराब झालेले आणि दूषित अन्न खाल्ल्याने दरवर्षी हजारो लोक आजारी पडतात. परिणामी गंभीर आजारांना बळी पडतात. याशिवाय प्रत्येक व्यक्तीला पुरेशा प्रमाणात सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे हा देखील अन्न सुरक्षेचा उद्देश आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) दरवर्षी हा दिवस अन्न-जनित आजारांना प्रतिबंधित करणे, शोधणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे या उद्देशाने साजरा करते.

जागतिक अन्न सुरक्षा दिनाचे महत्त्व WHO च्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर दरवर्षी प्रत्येक 10 पैकी एक व्यक्ती अन्नजन्यe आजारांनी ग्रस्त आहे. चांगल्या आरोग्यासाठी सुरक्षित अन्न आवश्यक असले तरी असुरक्षित अन्नामुळे विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. खराब अन्न गुणवत्तेचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे व्यक्तीची वाढ आणि विकास प्रभावित होतो. यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, असंसर्गजन्य आणि संसर्गजन्य रोगांसह मानसिक आजारांचा धोका वाढतो. अन्नजन्य रोग सामान्यतः डोळ्यांना दिसत नाहीत आणि ते संसर्गजन्य, विषारी असतात.

पीक उत्पादन, साठवणूक, वितरण, तयार करणे आणि खाणे या प्रत्येक टप्प्यावर अन्न सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे, हा संदेश देणे हे जागतिक अन्न सुरक्षा दिनाचे उद्दिष्ट आहे.जागतिक अन्न सुरक्षा दिनाचा इतिहास संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 2018 मध्ये महत्त्वाच्या अन्न सुरक्षा मुद्द्याबद्दल जनजागृती वाढविण्यासाठी जागतिक अन्न सुरक्षा दिवस सुरू केला. जागतिक अन्न सुरक्षा दिनाची सुरुवात जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) सदस्य देश आणि इतर भागीदारांच्या सहकार्याने संयुक्तपणे केली.आज जागतिक अन्न सुरक्षा दिन जरी असला तरी आपण वर्षभर सुरक्षितच अन्न खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

चांगल्या आरोग्यासाठी सुरक्षित अन्न आवश्यक असले तरी असुरक्षित अन्नामुळे विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. खराब अन्न गुणवत्तेचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो,ज्यामुळे व्यक्तीची वाढ आणि विकास प्रभावित होतो.यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, असंसर्गजन्य आणि संसर्गजन्य रोगांसह मानसिक आजारांचा धोका वाढतो. अन्नजन्य रोग सामान्यतः डोळ्यांना दिसत नाहीत आणि ते संसर्गजन्य, विषारी असतात. पीक उत्पादन, साठवणूक, वितरण, तयार करणे आणि खाणे या प्रत्येक टप्प्यावर अन्न सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे, हा संदेश देणे हे जागतिक अन्न सुरक्षा दिनाचे उद्दिष्ट आहे.

 

Nutritionist & Dietician

 Naturopathist

 Dr. Amit Bhorkar

 whats app: 7218332218

English Summary: Learn the history and significance of World Food Security Day today
Published on: 08 June 2022, 07:30 IST