Others News

शुक्रवारी लाव्हा कंपनीचा एक्स सिरीज चा स्मार्टफोन LAVA X2 भारतामधील लॉन्च करण्यात आला असून कंपनीच्या म्हणण्यानुसार हा या सीरिजमधील पहिला फोन आहे आणि तो खासकरून बजेट ग्राहकांसाठी तयार करण्यात आला आहे.

Updated on 06 March, 2022 9:43 AM IST

शुक्रवारी लाव्हा कंपनीचा एक्स सिरीज चा स्मार्टफोन LAVA X2 भारतामधील लॉन्च करण्यात आला असून कंपनीच्या म्हणण्यानुसार हा या सीरिजमधील पहिला फोन आहे आणि तो खासकरून बजेट ग्राहकांसाठी तयार करण्यात आला आहे.

या फोनची किंमत सहा हजार 999 रुपये ठेवण्यात आली आली असून या सवलतीच्या किमतीवर 11 मार्च पर्यंत ॲमेझॉन वरून प्री बुकिंग करता येणार आहे. ॲमेझॉन च्या लिस्ट नुसार हा फोन ग्राहकांना ब्ल्यू रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येणार असून लावा ईस्टोर वरून देखील खरेदी करता येणार आहे.

LAVA X2फोनची वैशिष्ट्ये

या स्मार्टफोनमध्ये साडेसहा इंचाचा एचडी + आयपीएस डिस्प्ले आणि 5000 mAH ची बॅटरी देण्यात आले आहे.

त्यासोबतच ड्युअल सिम सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन स्टॉकअँड्रॉइड 11गोएडिशन वर चालतो.तसेच हा स्मार्टफोन 2जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज सह जोडलेला ऑक्टकोर मीडिया टेक हेलिओप्रोसेस द्वारे समर्थित आहे. या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा असून सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग साठी समोर 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिलेला आहे. 

एवढेच नाही तर मागच्या बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे  व फेस अनलॉक देखील उपलब्ध आहे. कनेक्टिविटी साठी वाय-फाय, ब्लूटूथ,3.5मी मी ऑडिओ जॅक, यूएसबी टाइप सी चार्जिंग फोर्ट आणि ओटीजीसपोर्ट देखील देण्यात आला आहे.

English Summary: lava x2 android mobile phone launch in india this phone get 6999 rupees
Published on: 06 March 2022, 09:43 IST