दिल्ली: आप सरकारने दिल्ली नंतर पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये महिन्याला 300 युनिट मोफत वीज पुरवण्याचा निर्णय जाहीर केला होता. याची सुरुवात एक जुलैपासून झाली आहे. आता पंजाबमध्ये 300 युनिट मोफत वीज दिली जाणार आहे.
ऐतिहासिक निर्णय
पंजाबमध्ये महिन्याला 300 युनिट मोफत वीज पुरवण्याचा ऐतिहासिक निर्णय आप सरकारने घेतला आहे. वीज ग्राहकांना शून्य वीज बिल येणार आहे. एवढेच नाही तर 31 डिसेंबर 2021 पूर्वीचे जे थकीत वीज बिल आहे ते पण माफ करण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. प्रत्येक नागरिकाला 300 युनिट पर्यंत वीज मोफत मिळणार आहे.
पंजाब मधील 62 लाख 25 हजार वीज ग्राहकांना थेट लाभ मिळणार आहे. पंजाब सरकार यापूर्वीपासूनच विविध श्रेणीतील वीज ग्राहकांना दरवर्षी चार हजार कोटी रुपये वीजबिलाचे अनुदान देते. यामध्ये अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्ग प्रवर्ग आणि दारिद्रय रेषेखालील प्रवर्गातील कुटुंबांचा समावेश आहे.
मोठी बातमी : शिवसेनेतून 'या' माजी खासदाराची हकालपट्टी; कारण...
शिंदे सरकार घेणार का असा निर्णय ?
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करून भाजप सोबत जाऊन सरकार स्थापन केले. महाराष्ट्रात विजेचा प्रश्न खूप मोठा आहे. राज्यात वीज बिलाच्या प्रश्नावरून खूप राजकारण केले गेले आहे. पंजाबमध्ये 300 युनिट मोफत वीज दिली जाणार आहे. राज्यात शिंदे असा काही निर्णय घेणार का? या कडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.
जाता जाता महाविकास आघाडी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, शेतकरी खुश..
Published on: 03 July 2022, 11:52 IST