Others News

उत्तराखंडमध्ये क्षणात बदलणाऱ्या हवामानाचं रौद्र रुप पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. ज्यामुळं सध्या या भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. केदारनाथ यात्रेतील मुख्य टप्पा असणाऱ्या गौरीकुंड येथील डाक पुलिया भागात दरड कोसळण्याची घटना घडली असून, या भागामध्ये आतापर्यंत 10 हून अधिकजण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

Updated on 04 August, 2023 11:23 AM IST

उत्तराखंडमध्ये क्षणात बदलणाऱ्या हवामानाचं रौद्र रुप पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. ज्यामुळं सध्या या भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

केदारनाथ यात्रेतील मुख्य टप्पा असणाऱ्या गौरीकुंड येथील डाक पुलिया भागात दरड कोसळण्याची घटना घडली असून, या भागामध्ये आतापर्यंत 10 हून अधिकजण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. ज्यानंतर लगेचच त्यांनी या पर्वतीय भागामध्ये शोधकार्य हाती घेतलं. सतत सुरु असणाऱ्या पावसामुळं या भागात शोधकार्यातही अडचणी येत असल्याची माहिती यंत्रणांनी दिली आहे

मुख्य बाब म्हणजे डाक पुलिया भागापासून नजीकच वाहणाऱ्या नदीची पाणीपातळीही वाढली असल्यामुळं बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याच्या कामाला वेग आला आहे.

English Summary: Landslides in Gaurikund in Uttarakhand; Kedarnath Yatra was stopped immediately
Published on: 04 August 2023, 11:23 IST