ऑगस्ट महिना सुरू असून आता ऑगस्ट महिना संपायला अवघे अकरा ते बारा दिवस बाकी आहेत. परंतु तुम्हाला या महिन्याच्या अखेरपर्यंत अनेक महत्त्वपूर्ण कामे तडीस लावणे गरजेचे आहे. नाहीतर उगीचच पश्चाताप करायची वेळ येण्याची देखील दाट शक्यता आहे. या लेखात आपण अशाच दोन महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ ज्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत करणे गरजेचे आहे.
ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत करा या गोष्टी
1- पीएम किसान सम्मान निधि योजनेसाठी ई केवायसी- पीएम किसान सम्मान निधि योजना साठी केंद्र सरकारने केवायसी करणे आवश्यक केले आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तसे पाहायला गेले तर ई केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 जुलै होती.
परंतु केंद्र सरकारने यामध्ये आता शेतकऱ्यांना दिलासा देत ई केवायसीची मुदत 31 ऑगस्टपर्यंत केली आहे. त्यामुळे 31 ऑगस्टच्या अगोदर ई केवायसीची प्रक्रिया शेतकरी बंधूनी पूर्ण करणे गरजेचे आहे. नाहीतर पुढे येणारे पी एम किसान निधी चे हफ्ते मिळू शकणार नाहीत.
यामुळे तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटरला भेट देऊन ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अगदी घरबसल्या देखील संकेतस्थळाच्या माध्यमातून ही प्रक्रिया करू शकता.
नक्की वाचा:Scheme:महावितरणची 'ही' योजना आहे खूप फायदेशीर,वीज बिलामध्ये करता येते मोठी बचत
2- बंधुंनो पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहक असाल तर केवायसी गरजेचे-जे शेतकरी बंधू पंजाब नॅशनल बँकेचे खातेदार असतील अशा सर्व खातेदारांनी 31 ऑगस्टपर्यंत केवायसी करून घेण्यास बँकेने सांगितले आहे.याबाबत बँकेने म्हटले आहे की,जर खातेधारकांना केवायसी दिलेल्या मुदतीत केले नाही तर बँक खाते बंद केले जाऊ शकते.
म्हणून ज्या खातेदारांचे केवायसी बाकी असेल त्यांनी ते लवकरात लवकर पूर्ण करून भविष्यात होणाऱ्या त्रासापासून वाचावे.
याबाबतीत बँकेने एक स्पष्टीकरण दिले आहे की ज्यांनी 31 मार्च 2022 पर्यंत त्यांचे केवायसी केले असेल त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा समस्या निर्माण होणार नाही मात्र ज्यांचे प्रलंबित आहे त्यांनी 31 ऑगस्टपर्यंत केवायसी करणे गरजेचे आहे.
Published on: 19 August 2022, 01:13 IST