Others News

जमीनीतील कूळ हक्क_* 58- 59- _जमीनीला कूळ लागणे हा वाक्यप्रयोग आता आपल्याला चांगलाच माहिती झालेला आहे. कुळ म्हणजे काय? कुळ कसा तयार होतो? कूळाचे कोणते कोणते हक्क असतात शेतजमिनी व कुळ यांचे कायदेशीर संबंध काय आहे? याची आज आपण माहिती घेणार आहोत. “कसेल त्याची जमीन असेल” असे तत्व घेऊन कुळ कायदा अस्तित्वात आला._ 60- _दुसऱ्यांची जमीन कायदेशीर रित्या कसणारा व प्रत्यक्ष कष्ट करणारा जो माणूस आहे त्याला कूळ म्हटले गेले. सन १९३९ च्या कूळ कायद्यानुसार सर्व प्रथम जमिनीत असणाऱ्या कायदेशीर कुळांची नावे सात बाराचा इतर हक्कात नोंदली गेली. त्यानंतर 1948 चा कूळ कायदा अस्तित्वात आला. त्याने कुळांना अधिक अधिकार प्राप्त झाले. सुधारित कायद्या नुसार कलम ३२ ग नुसार दिनांक १.४.१९५७ रोजी दुसऱ्याच्या मालकीची जमीन कायदेशीररित्या करणाऱ्या व्यक्ती या जमीन मालक म्हणून जाहीर करण्यात आल्या. या जमीनी यथावकाश प्रत्यक्ष प्रकरणाच्या निकाला प्रमाणे कुळाच्या मालकीच्या झाल्या. गेल्या ४० वर्षामध्ये राज्यातील बहुसंख्य कूळ कायद्याच्या प्रकरणांचा निकाल लागला आहे. तरी देखील वेगवेगळया कारणामुळे किंवा वरिष्ठ न्यायालयात चाललेल्या अपीलामुळे अजूनही कूळ कायद्यांचे हजारो दावे प्रलंबित आहेत._

Updated on 29 June, 2021 1:23 PM IST
  • जमीनीतील कूळ हक्क_
  • _जमीनीला कूळ लागणे हा वाक्यप्रयोग आता आपल्याला चांगलाच माहिती झालेला आहे. कुळ म्हणजे काय? कुळ कसा तयार होतो? कूळाचे कोणते कोणते हक्क असतात शेतजमिनी व कुळ यांचे कायदेशीर संबंध काय आहे? याची आज आपण माहिती घेणार आहोत. “कसेल त्याची जमीन असेल” असे तत्व घेऊन कुळ कायदा अस्तित्वात आला._
  •    _दुसऱ्यांची जमीन कायदेशीर रित्या कसणारा व प्रत्यक्ष कष्ट करणारा जो माणूस आहे त्याला कूळ म्हटले गेले. सन १९३९ च्या कूळ कायद्यानुसार सर्व प्रथम जमिनीत असणाऱ्या कायदेशीर कुळांची नावे सात बाराचा इतर हक्कात नोंदली गेली. त्यानंतर 1948 चा कूळ कायदा अस्तित्वात आला. त्याने कुळांना अधिक अधिकार प्राप्त झाले. सुधारित कायद्या नुसार कलम ३२ ग नुसार दिनांक १.४.१९५७ रोजी दुसऱ्याच्या मालकीची जमीन कायदेशीररित्या करणाऱ्या व्यक्ती या जमीन मालक म्हणून जाहीर करण्यात आल्या. या जमीनी यथावकाश प्रत्यक्ष प्रकरणाच्या निकाला प्रमाणे कुळाच्या मालकीच्या झाल्या. गेल्या ४० वर्षामध्ये राज्यातील बहुसंख्य कूळ कायद्याच्या प्रकरणांचा निकाल लागला आहे. तरी देखील वेगवेगळया कारणामुळे किंवा वरिष्ठ न्यायालयात चाललेल्या अपीलामुळे अजूनही कूळ कायद्यांचे हजारो दावे प्रलंबित आहेत._
  • कूळ हक्क :आजरोजी जमीन कसणा-या कूळांचे किंवा मालकांचे, कूळ हक्कासंबंधी काही महत्वाचे मुद्दे असून ते समजल्या खेरीज कूळ हक्काबाबत स्पष्ट जाणीव शेतक-यामध्ये होणार नाही. हे मुद्दे खालील प्रमाणे आहेत._
  • _*१)*
  • सन 1939 च्या कूळ कायद्यात दिनांक1.1938 पूर्वी सतत 6 वर्षे कूळ म्हणून जमीन करणार्याल व्यक्तीला किंवा दिनांक 1.1.1945 पूर्वी सतत 6 वर्षे जमीन कसणारा आणि दिनांक 1.11.47 रोजी जमीन कसणारा कूळ या सर्वांची नोंद नोंदणी पत्रकात संरक्षीत कूळ म्हणून केली गेली._
  • _२) सन 1955 साली कूळ कायद्यात काही सुधारणा करण्यांत आली. ही सुधारणा करण्यापूर्वी वहिवाटीमुळे किंवा रुढीमुळे किंवा कोर्टाच्या निकालामुळे ज्या व्यक्तींना कायम कूळ म्हणून संबोधण्यांत आले व ज्यांची नोंदणी हक्क नोंदणी पत्रकात कायम कूळ म्हणून नोंद केली गेली त्या सर्वांना कायम कूळ असे म्हटले जाते._
  • _*३)* आज रोजी दुस-याच्या मालकीची कोणती ही जमीन कायदेशीररित्या जर एखादा माणूस कसत असेल व अशी जमीन, जमीन मालकाकडून जातीने कसण्यांत येत नसेल तर त्याला कूळ असे संबोधले जाते. याचाच अर्थ तो माणूस जमीन मालकाच्या कुटूंबातील नसला पाहिजे किंवा जमीन गहाण घेणारा नसला पाहिजे किंवा पगारावर ठेवलेला नोकर नसेल किंवा मालकाच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीच्या देखरेखीखाली जमीन कसत नसेल तर त्याला कूळ असे म्हणतात._
  • _*४)* कूळ होण्याच्या नियमाला काही महत्वाचे अपवाद करण्यांत आले आहेत. विधवा किंवा अवयस्क व्यक्ती किंवा शरीराने किंवा मनाने दुर्बल झालेला माणूस किंवा सैन्य दलात काम करणारा माणूस, यांची जमीन दुसरी व्यक्ती जर कसत असेल तरी, त्या व्यक्ती स्वत:च जमीन कसतात असे मानले जाते._
  • _*५)* कूळ हक्काच्या संदर्भातील दुसरी बाजू म्हणजे जमीन मालकाने स्वत:हून जमीन कसणे होय. याची व्याख्यासुध्दा कूळ कायद्यात करण्यांत आली आहे. एखादा इसम स्वत: जमीन कसतो काय, हे ठरविण्यासाठी खालील नियम लावले जातात._
  • _*(अ)* ८ स्वत: अंग मेहनतीने तो जमीन कसत असेल तर,_
  • _*(ब)* स्वत:च्या कुटूंबातील कोणत्याही इसमाच्या अंग मेहनतीने जमीन कसत असेल तर,_
  • _*(क)* स्वत:च्या देखरेखीखाली मजूरीने लावलेल्या मजूरांकडून जमीन करुन घेत असेल तर, असे मजूर कि ज्याला पैसे दिले जात असोत किंवा मालाच्या रुपाने वेतन दिले जात असो. परंतू पिकाच्या हिश्श्याच्या रुपाने जर मजूरी दिली गेली तर तो कूळ ठरु शकतो._
  • _*६)* कूळ ही संकल्पना समजण्यास थोडी अवघड आहे, परंतु कूळ होण्यासाठी खालील महत्वाचे घटक मानले जातात._
  • _*(अ)* दुस-याच्या मालकीची जमीन अन्य इसम वैध किंवा कायदेशीर रित्या कसत असला पाहिजे._
  • _*(ब)* जमीन मालक व कूळ यांच्यात तोंडी का होईना करार झाला असला पाहिजे व तोंडी करार कोर्टात सिध्दा झाला पाहिजे._
  • _*(क)* असा इसम प्रत्यक्ष जमीन कसत असला पाहिजे व त्या बदल्यात तो मालकाला खंड देत असला पाहिजे._
  • _*(ड)* जमीन मालक व कूळ यांच्यात पारंपारिक रित्या जपलेले मालक व कूळ असे विशिष्ठ सामाजिक नाते असले पाहिजे._
  • कूळ कायदा कलम-43 च्या अटी :* जी कूळे, यापूर्वी जमीनीचे मालक झाले आहेत, त्यांच्या दृष्टीने कूळ कायदा कलम 43 नुसार जमीन विकायला बंदी केली जाते व तसा शेरा त्याच्या 7/12 वर इतर हक्कात लिहिला असतो. “कूळ कायदा कलम-43 ला पात्र” अशा प्रकारचा हा शेरा 7/12 वर लिहिला जातो._
  • _शहरीकरणामुळे किंवा स्वत:च्या गरजेनुसार जमीन विकण्याची आवश्यकता असल्यास, कूळांना अशी जमीन विकण्यापूर्वी प्रांत अधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते. जमीन विक्रीची परवानगी कोणाला द्यावी या बाबतचे नियम देखील शासनाने बनविले आहे. त्यानुसार कूळ कायदा कलम-43 ला पात्र असलेली जमीन खालील अटींवर विकता येते._
  • _*१)* बिगरशेती प्रयोजनासाठी_
  • _*२)* धर्मादाय संस्थांसाठी किंवा शैक्षणिक संस्थेसाठी किंवा सहकारी संस्थे साठी_
  • _*३)* दुस-या शेतक-यातला परंतू जर असे कूळ कायमचा शेती व्यवसाय सोडून देत असेल तर किंवा जमीन कसायला असमर्थ ठरला असेल तर._
  • _*४)* अशी जमीन विकण्यापूर्वी शासकीय खजिन्यात अतिशय नाममात्र म्हणजे जमीनीच्या आकाराच्या 40 पट एवढी नजराण्याची रक्कम भरावी लागते._
  • _याचा अर्थ अशी जमीन सार्वजनिक कामासाठी किंवा संस्थांना विकतांना फारशा जाचक अटी नाहीत. परंतू सर्रास दुस-या जमीन मालकास अतिशय किरकोळ पैसे भरुन मालकीच्या झालेल्या जमीनी, कूळांनी परस्पर विकू नयेत म्हणून वरील क्र.3 ची महत्वाची अट ठेवण्यांत आली आहे. व त्यांना शेवटचा उपाय म्हणून शेती व्यवसाय सोडतानाच अशी कूळ हक्काची जमीन विकली पाहिजे असा याचा अर्थ आहे._

 

  • _नव्याने कुळ हक्क निर्माण होतो का? आज एखादा इसम कूळ होऊ शकतो का? कूळ कायदा कलम-32 (ग) नुसार दिनांक4.57 रोजी जमीन कसणा-या माणसाला मालक म्हणून जाहिर केले आहे, परंतु आजरोजी जमीनीत नव्याने कूळ निर्माण होऊ शकतो काय? व असल्यास कशा पध्दतीने कूळ निर्माण होतो या बाबत शेतक-यामध्ये कुतूहल आहे. या बाबतची तरतूद कूळ कायद्याच्या कलम-32 (ओ) मध्ये नमूद करण्यांत आली आहे._
  • _कूळ कायदा कलम-32 (ओ) नुसार आजही दुस-याची जमीन कायदेशीररित्या एक वर्ष जरी दुसरा इसम कसत असेल तर तो कूळ असल्याचा दावा करु शकतो. तथापी त्यासाठी खालील महत्वाच्या अटी कायम आहेत._
  • _*अ)* वहिवाटदार व मालक यांच्यात करार झाला असला पाहिजे._
  • _*(ब)* तो मालकाकडून जमीन कसत असला पाहिजे._
  • _*(क)* तो खंड देत असला पाहिजे._
  • _*(ड)* जमीन मालक व कूळ असे विशिष्ठ नाते संबंध असले पाहिजेत._
  • _आज काल जमीन मालक स्वत:हून कोणतेही करार वहिवाटदाराशी करीत नसल्यामुळे, कलम-32(ओ) च्या दाव्यांची संख्या अतिशय अल्प आहे. जमीन मालकांमध्ये जागृती निर्माण झाल्यामुळे अशा पध्दतीचे कोणते ही करार तो वहिवाटदारा बरोबर करीत नाही. तथापी आधी पिक पाहणीला नांव लावून घ्यावयाचे._
  • _एक वर्षाच्या पिक पाहणीचा 7/12 जोडून दिवाणी न्यायालयातून जमीन मालकाला जमीनीत यायला मनाई आदेश आणावयाचे व त्यानंतर काही दिवसांनी कलम-32 (ओ) नुसार कूळ असल्याचा दावा करावयाचा अशा प्रकारे वहिवाटदार व्यक्ती कूळ असल्याचा दावा सर्व साधारणपणे करतात. तर अशाप्रकारे आपण कुळ म्हणजे काय? कुळ कसे तयार होते कुळाचे हक्क कुठ कुठले असतात. आणि शेत जमीन, कुळाचे काय कायदेशीर संबंध आहे त्या बद्दलची सविस्तर माहिती पाहिली._
  • लेखक - प्रविण सरवदे कराड

 

English Summary: kul kayada
Published on: 29 June 2021, 01:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)