Others News

आपल्या महान कार्याने कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशामध्ये सामाजिक परिवर्तन आणणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांची आज १०० वी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत आज १०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला आदरांजली वाहण्यात आली.

Updated on 06 May, 2022 1:34 PM IST

आपल्या महान कार्याने कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशामध्ये सामाजिक परिवर्तन आणणाऱ्या राजर्षी  शाहू महाराजांची आज १०० वी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत आज १०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला आदरांजली वाहण्यात आली.

मुंबई येथील पन्हाळा लॉज या ठिकाणी ६ मे १९२२ या दिवशी राजर्षी शाहू महाराजांचे निधन झाले. त्यानिमित्ताने कोल्हापुरातील सर्व व्यवहार १०० सेकंदासाठी थांबवण्यात येणार आहेत. या वंदन कार्यक्रमात महाराष्ट्रातून अनेकांनी सहभाग नोंदवला आहे.

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कोल्हापुरात दसरा चौक ते शाहू महाराज समाधी स्थळ इथपर्यंत कॅन्डल मार्च काढत लोक राजाला आदरांजली वाहिली. स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व राजर्षी शाहू समाधी स्थळ येथे शिव-शाहुज्योतीचे स्वागत महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

शाहू समाधी स्थळ येथे शाहू छत्रपती, संभाजी छत्रपती, विविध विभागांचे मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, नागरिकांनी स्तब्ध उभे राहून अभिवादन केले. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदिना निमित्त सकाळी १० वाजता पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी यांनी १०० सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन केले.

स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व राजर्षी शाहू समाधी स्थळ येथे शिव-शाहुज्योतीचे स्वागत महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. कोल्हापूरमधील अभिवादनावेळी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजी छत्रपती इत्यादी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या
Pm Kisan Yojna : पीएम किसानचा 11वा हफ्ता लवकरच होणार बँकेत जमा; पैसे न मिळाल्यास या नंबरवर करा तक्रार 
भावांनो यावर्षी पाऊस येणार लवकर! 20 ते 21 मेपर्यंत अंदमानमध्ये ते 30 मे पर्यंत केरळमध्ये होणार मान्सूनचे आगमन


English Summary: Kolhapur stood still for 100 seconds and paid a unique tribute to Lok Raja Shahu Maharaj
Published on: 06 May 2022, 01:34 IST