Others News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान जन धन खाते योजना आणली होती. या योजनेला लोकांनी चांगली पसंती दिली होती. या योजनेच्या अंतर्गत साधरण २० कोटी नागरिकांनी बँकेत खाते उघडले. दरम्यान सध्या देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून अनेक कामधंदे बंद पडले आहेत. यामुळे लोकांकडे कामे नसून हातातील पैसा संपला आहे.

Updated on 02 March, 2021 5:45 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान जनधन खाते योजना आणली होती,  या योजनेला लोकांनी चांगली पसंती दिली.  या योजनेच्या अंतर्गत साधरण २० कोटी नागरिकांनी बँकेत खाते उघडले.  दरम्यान सध्या देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून अनेक कामधंदे बंद पडले आहेत.  यामुळे लोकांकडे कामे नसून हातातील पैसा संपला आहे.  या लॉकडाऊनच्या काळात गरिब जनतेला त्रास होऊ नये, यासाठी सरकारकडून महिलांच्या जनधन खात्यात ५०० रुपये टाकण्याची घोषणा केंद्र सरकारने केली.  त्या घोषणेनंतर सरकारने लोकांच्या खात्यात पैसे वर्गही केले आहेत.

परंतु पैसे काढताना लाभार्थी बँकेत गर्दी करतात.लाभार्थ्यांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. यात काहीजण फक्त आपल्या खात्यात किती जमा राशी आहे. याचाच तपास करण्यासाठी येतात. खात्याची जमा राशी जाणून घेण्यासाठी लाभार्थ्यांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागत असते. यासर्व बाबींचा विचार करुन बँकांनी एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे.  यावरून आपण आपल्या खात्यातील माहिती जाणून घेऊ शकतो,  तेही घरी बसून.  बँकांकडून देण्यात आलेल्या नंबरवर आपण मिस कॉल करुन आपल्या खात्याची माहिती  मिळवू शकतो. त्यासाठी आपला मोबाईल नंबर हा बँक खात्याशी जुडलेला असावा. 

हेही वाचा:बापरे! ४० कोटी लोकांनी उघडले जन धन खाते; जमा झाले १.३० कोटी रुपये

SBI  बँकेच्या खातेधारकांनी असा तपासा आपली शिल्लक

भारतीय स्टेट बँक खातेधारकांसाठी १८००४२२५३८०० आणि १८००११२२११ हे कस्टर केअरचे नंबर आहेत. यावर कॉल केल्यानंतर आपण आपली भाषा निवडायची. त्यानंतर रजिस्टर्ड नंबर साठी १ हा अंक दाबा. बाकी/शिल्लक बॅलन्सचे पाच व्यवहाराच्या ट्रॅन्ज़ैक्शनसाठी १ बटन दाबा.  यासह भारतीय स्टेट बँकेचे खातेधारक आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन ९२२३७६६६६६ वर कॉल करू शकता. खातेधारकांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी ०९२२३४८८८८८ वर मेसेज करावा लागेल. या मेसेजमध्ये ग्राहकांना'REG AccountNumber' लिहून पाठवा लागेल.  उदाहरण - जर तुमचा अकाउंट नंबर १२३४५४३२४५६आहे तो आपल्याला REG १२३४५४३२४५६ हे लिहून पाठवा लागेल.  त्यानंतर आपल्याला कंफर्मेशन मेसेज मिळेल. त्यानंतर तुम्ही खात्याची माहिती जाणून घेऊ शकता.  याशिवाय तुम्ही sbi Quick एप्प डाऊनलोड करु पण माहिती मिळवू शकता. याला इंटरनेट लागतेच असे नाही. इंटरनेट नसल्यासही तुम्ही खात्याची माहिती जाणून घेऊ शकता.

पीएनबी PNB खात्याची शिल्लक अशी जाणून घ्या (पंजाब बँक)

BAL (space) सोळा अंकाचा खाते क्रमांक लिहून ५६०७०४० वर एसएमएस करा. किंवा खातेधारक आपल्य़ा रजिस्टर्ड मोबाईलवरुन १८००१८०२२२३ किंवा ०१२०२३०३०९० वर मिस कॉल करुन एसएमएसच्या द्वारे आपल्या खात्याची माहिती जाणून घेऊ शकता. ही सेवा बचत आणि चालू खात्यासाठी पण आहे. जर आपला मोबाईल नंबर रजिस्टर्ड नाही आहे, तर या सेवेसाठी आपण जवळील बँकेच्या शाखेत जाऊन ही सेवा चालू करु शकता.

OBC बँकेच्या ग्राहकांनी खालील प्रमाणे आपले खाते तपासावे

या बँकेचे ग्राहक आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरने ८०६७२०५७६७ नंबरवर मिस कॉल करुन आपल्या खात्याची माहिती आणि शिल्लक विषयीचा तपशील घेऊ शकता. यासह आपण १८००-१८०-१२३५ नंबर वर कॉल करुन बँकेच्या ग्राहक  सेवा अधिकारीशी बोलू शकता.

CO बँकेचे ग्राहक याप्रमाणे तपासा आपले खाते

या बँकेचे ग्राहक आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ०९२७८७९२७८७ किंवा १८००-२७४-०१२३ वर कॉल करुन आपल्या खात्याची माहिती जाणून घेऊ शकता. 

हेही वाचा:जनधन खातेधारकांसाठी बँकांनी घेतला 'हा' मोठा निर्णय ; खातेधारकांना मिळाला दिलासा

इंडियन बँक( Indian Bank)चे ग्राहक जाणून आपले खाते तपासण्याची पद्धत

आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून १८००४२५००००० वर कॉल करा. याशिवाय ९२८९५९२८९५ या नंबरवर कॉल करुन आपल्या खात्याचा तपशील जाणून घेऊ शकता.

Bank of India चे ग्राहक(बँक ऑफ इंडिया)

या बँकेचे ग्राहक ०९०१५१३५१३५ वर मिस कॉल करुन आपल्या खात्यातील शिल्लक विषयी जाणून घेऊ शकता.

HDFC ग्राहक जाणून घ्या आपल्या खात्याची माहिती

एचडीएफसी बँक मिस कॉलवर खात्याची माहिती देण्यासह अनेक सेवा देते. आपण मिनी स्टेटमेंट आणि धानदेश पुस्तिका, चेक बुक ही मागवू शकता. बँलन्स जाणून घेण्यासाठी टोल फ्री नंबर १८००२७०३३३३, मिनी स्टेटमेंटसाठी १८००२७०३३५५, चेकबुक मागविण्यासाठी १८००२७०३३६६, अकाउंट स्टेटमेंटसाठी १८००२७०३३७७ वर कॉल करु शकता. मोबाईल बँकिंगसाठी १८००२७०३३४४ या नंबरवर कॉल करु शकता.

ICICI Bank चे खातेधारक जाणून घ्या आपल्या खात्याची माहिती

आपल्या खात्याची माहिती जाणून घेण्यासाठी ९५९४६१२६१२ वर मिस कॉल देऊ शकता. याशिवाय ग्राहक आपल्या खात्यातील शिल्लक विषयी बॅलन्सविषयी माहिती घेण्यासाठी 'IBAL' लिहून ९२१५६७६७६६ वर मेसेज करु शकता. स्टेटमेंटसाठी ९५९४६१३६१३ डायल करावा लागेल. तर मिनी स्टेटमेंटसाठी 'ITRAN' टाईप करून ९२१५६७६७६६ वर पाठवू शकता.

Axis Bank चे ग्राहक

आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरने १८००४१९५९५९ वर कॉल करून अकाऊंटवरील शिल्लक जाणून घेऊ शकता. मिनी स्टेटमेंट जाणून घेण्यासाठी ग्राहक १८००४१९६९६६९ वर कॉल करु शकता. तर ०८०४८३३६२६२ नंबरवर कॉल करुन ग्राहक आपला मोबाईल रिचार्ज पण करु शकता.

IDBI Bank चे ग्राहक

या बँकेचे ग्राहक १८००८४३११२२ वर मिस कॉल देऊन आपले खात्याची माहिती घेऊ शकता. तर १८००८४३११३३ वर कॉल करुन आपला मिनी स्टेटमेंट मागवू शकता.

English Summary: know your jan dhan account balance information on miss call
Published on: 14 April 2020, 01:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)