Others News

या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत.

Updated on 27 July, 2022 7:40 PM IST

या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत.शरीरामध्ये पाण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे.पाण्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन होते.पाण्यामुळे शरीरात गेलेले अन्नकण विरघळले जाऊन त्याचे संपूर्ण शरीरात माध्यम म्हणून उपयोग केला जातो. पाण्याच्या माध्यमात रासायनिक प्रक्रिया होतात. अन्ननलिकेत पाण्यामुळे मऊपणा येतो. शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित चालू राहते. तसेच टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. पाण्यामुळे शरीराचे तापमान सामान्य राखण्यास मदत होते.पशु संगोपनात स्वच्छ पाण्याची आवश्यकता - दूषित पाण्यामुळे जनावरांना कृमी बाधा किंवा जंतबाधा, पचनाचे विकार, चर्मरोग ,पोटफुगी यासारखे आजार

होतात. अशा आजारामुळे पशुपालकाला आर्थिक फटका बसतो इ-कोलाय नावाच्या जिवाणूमुळे जनावरांना हगवण, अतिसार याची लागण होते .अस्वच्छ पाण्यात हे जिवाणू आढळत असल्याने जनावरांना असे पाणी पिण्यास देऊ नये.हगवणीमुळे जनावरे अशक्त होतात व जनावरांचे दूध उत्पादन सुद्धा कमी होते .तसेच जास्त दिवस साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये शेवाळ वाढते हे शेवाळ विविध विषाची निर्मिती करण्यास कारणीभूत ठरते त्यामुळे जनावरांमध्ये विषबाधा होण्याची संभावना असते .पाण्याचे प्रमाण - हे जनावराच्या शरीराचे आकारमान , हवामान, खाद्याचा प्रकार, गाभण दुभती जनावरे यावर अवलंबून असते. शरीराचे योग्य तापमान राखण्याकरिता उन्हाळ्यात जनावरांना मुबलक प्रमाणात पाणी पाजण्याची गरज असते

दिवसभराच्या खाद्यामध्ये हिरव्या चाऱ्याचे प्रमाण जास्त असेल तर पिण्याचे पाणी कमी लागते व वाळलेला चाऱ्याचे प्रमाण जास्त असेल तर पिण्याचे पाणी जास्त लागते.If the amount of dry fodder is more, drinking water is required more.कामाचे बैल, दुभती किंवा गाभण जनावरे आणि लहान वाढत्या जनावरांना जास्त प्रमाणात पाणी लागते.दुभत्या जनावरांना दर लिटर दुधामागे पाच लिटर पाणी अधिक पाजावे तसे शरीरासाठी 25 ते 30 लिटर पाणी आवश्यक असते.सर्वसाधारणपणे दुधाळु जनावरास दिवसभरामध्ये 80 ते 120 लिटर पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असते .आजारी जनावरांसाठी जागेवरच पाण्याची सोय करावी .पाण्याचा हौद हा जनावरांना पाणी पिता येईल इतकाच उंच असावा व त्यात रोज स्वच्छ पाणी भरावे.पिण्याच्या पाण्याचा हौद नेहमी साफ करावा जेणेकरून त्यामध्ये शेवाळ होणार नाही याची

काळजी घ्यावी.जनावरांना स्वच्छ पाणी पिण्यास न दिल्यास त्याचा आरोग्यावर उत्पादन क्षमतेवर तसेच प्रज्योत्पादनावर परिणाम होतो. याकरता गावातील हौदाची नियमित स्वच्छता राखणे आवश्यक आहे. हौदासमोर घाण साजता कामा नये कारण घाणीतून बरेचसे रोगजंतू पाण्यावाटे जनावराच्या शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे जनावरे आजारी पडतात.हौदाचा परिसर स्वच्छ करणे आणि ठराविक कालावधीत हौदाच्या आतील बाजूस चुना लावावा व रंगोटी करणे आवश्यक असते.सध्या पावसाळा सुरू झाला आहे सगळीकडे डबके साचलेले असतात त्यामध्ये गढूळ पाणी असल्यामुळे ते पाणी जनावरांना पाजू नये.तेव्हा शेतकरी बांधवांना विनंती की त्यांनी आपल्या जनावरांना स्वच्छ व ताजे पाणी पिण्यास द्यावे त्यामुळे जनावर आजारी पडणार नाही व उत्पन्नावर परिणाम पण होणार नाही.

 

डॉ शरद कठाळे

कृषी विज्ञान केंद्र

घाटखेड अमरावती

English Summary: Know the importance of clean water while managing livestock during monsoons
Published on: 27 July 2022, 07:40 IST