Others News

भारतात आधार कार्ड एक प्रमुख दस्ताऐवज आहे, याशिवाय भारतात सिम कार्ड देखील खरेदी करता येत नाही. म्हणुन हे डॉक्युमेंट सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. असे असले तरी अनेक लोकांचे आधार कार्ड पावसामुळे खराब होते त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते

Updated on 08 December, 2021 2:17 PM IST

भारतात आधार कार्ड एक प्रमुख दस्ताऐवज आहे, याशिवाय भारतात सिम कार्ड देखील खरेदी करता येत नाही. म्हणुन हे डॉक्युमेंट सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. असे असले तरी अनेक लोकांचे आधार कार्ड पावसामुळे खराब होते त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते

जर तुमचेही आधार कार्ड खराब झाले असेल तर चिंता करू नका, आता UIDAI आपल्याला प्लास्टिकचे अर्थात पीवीसी आधार कार्ड उपलब्ध करून देत आहे, हे आधार कार्ड पाण्यामुळे खराब होणार नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे आधार कार्ड प्राप्त कसे करायचे? मित्रांनो काळजी करू नका PVC आधार कार्ड तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मिळवू शकता. आज कृषी जागरण आपणांस ऑनलाईन PVC आधार कार्ड काढण्याची प्रोसेस सांगणार आहे, चला तर मग जाणुन घेऊया याविषयी.

जर तुम्हालाही PVC आधार कार्ड हवे असेल तर आपणास UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल आणि PVC आधार कार्डसाठी अँप्लाय करावे लागेल. ऑनलाईन अँप्लिकेशन दिल्यानंतर PVC आधार कार्ड आपल्या पत्त्यावर पोहच केले जाईल. हे नवीन PVC आधार कार्ड प्राप्त करण्यासाठी तुम्हाला नाममात्र शुल्क द्यावा लागेल, जो की आहे फक्त 50 रुपये. आपण 50 रुपयात PVC आधार कार्ड मिळवू शकता.

PVC आधार कार्डसाठी अँप्लाय करण्याची प्रोसेस

»PVC आधार मिळवण्यासाठी सर्व्यात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

»तिथे गेल्यावर आपणांस Order Pvc Aadhar Card हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

»यानंतर आपणास आपला बारा अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल, त्याबरोबरच आपणांस सेक्युरिटी कोडं देखील भरावा लागतो.

»एवढी माहिती भरल्यानंतर Send OTP ह्या पर्यायावर क्लिक करा.

»OTP हा तुमच्या आधार ला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात येईल, OTP प्राप्त झाल्यानंतर आपणास तो दिलेल्या रकाण्यात व्यवस्थित भरावा लागेल.

»यानंतर आपण दिलेली माहिती व्यवस्थित चेक करून घ्या आणि आधार साठी लागणारी फी जमा करा.

»आपण पेमेंट ऑनलाईन करू शकता, यासाठी वेगवेगळे ऑप्शन तिथे उपलब्ध आहेत.

»शुल्क जमा होताच आपल्याला एक पावती मिळेल, आणि आपले PVC आधार कार्ड घरी डिलिव्हर केले जाईल.

English Summary: know online process to make plastic adhaar card pvc adhaar card
Published on: 08 December 2021, 02:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)