Others News

कोरोना व्हायरसमुळे देशातील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे बँकांकडून शेतकऱ्यांना केसीसी किसान क्रेडिट कार्डची सुविधा पुरवली जात आहे. या कार्डची मदतीने शेतकरी आपल्या शेतीसाठी लागणारी अवजारे, खते, खाद्य घेऊ शकतो

Updated on 11 May, 2020 5:35 PM IST

 

कोरोना व्हायरस (covid-19) मुळे देशातील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे बँकांकडून शेतकऱ्यांना केसीसी किसान क्रेडिट कार्डची सुविधा पुरवली जात आहे. या कार्डची मदतीने शेतकरी आपल्या शेतीसाठी लागणारी अवजारे, खते, खाद्य घेऊ शकतो. इतकेच काय आता या कार्डमधील १० टक्के रक्कम शेतकरी आपल्या घरगुती खर्चासाठी वापरू शकतो. यासह सरकार विविध योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करत आहे.

आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून माहिती दिली आहे की, शेतकरी किसान क्रेडिट कार्डची १० रक्कम आपल्या घरगुती खर्चासाठी वापरू शकते. यासह कार्डधारक १.६० लाखाचे कर्ज घेऊ शकता. जे शेतकरी किसान योजनेचा लाभ घेत आहेत आणि ज्यांच्याकडे https://pmkisan.gov.in/ लिंक आहे ते किसान क्रेडिटसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. किंवा जो या योजनेचा लाभार्थी नाही तोही या संकेतस्थळावर जाऊन कार्ड घेऊ शकतो.  या क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक होमपेज दिसेल. त्यावर केसीसी डाऊनलोड असा एक पर्याय असेल तो निवडावा लागेल. त्यानंतर विचारण्यात आलेली सर्व माहिती भरावी लागेल. या लिंक व्यतिरिक्त तुम्ही या संकेतस्थळावरुन https://pmkisan.gov.in/Documents/Kcc.pdf. अर्ज मिळवू  शकता. 

क्रेडिट कार्डच्या कर्जासाठी लागणारी कागदपत्रे :
क्रेडिट कार्ड कर्जाचा अर्ज आपल्या स्वाक्षरीसह , आधारकार्ड, पॅनकार्ड,  मतदान कार्ड, आदी.  अर्जदाराचा राहण्याचा पत्ता, सातबारा उतारा किंवा शेत जमीन कसण्यासाठी घेतली असल्यास त्याचे प्रतिज्ञापत्र, पासपोर्ट साईज फोटो, कर्जासाठी तुम्ही थेट बँकेत जाऊ शकता. बँकेतील अधिकाऱ्यांकडून तुम्ही माहिती मिळवू शकता. त्याच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला ते कागदपत्र सांगतील. ती कागदपत्रे आपण जमा करु दिल्यास बँक आपल्याला कर्जाची पुर्तता करेल.  स्टेट बँकेतून जर तुम्ही कार्ड घेत असाल तर तुम्ही ऑनलाईनही यासाठी अर्ज करु शकता. https://sbi.co.in/ या संकेतस्थळावर गेल्यास आपल्याला अर्ज मिळेल.

दरम्यान पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वाटण्याच्या सुचना केंद्राने दिल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांला तीन लाखपर्यंतचे कर्ज मिळू शकते. महाराष्ट्रात २० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो. मात्र केसीसी किसान क्रेडिट कार्ट वाटण्याकडे बँकांना दुर्लक्ष करत असल्याती तक्रारी येत आहेत. पीएम किसान योजनेत समावेश झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने किसान क्रेडिट कार्डचे वाटप करुन खरिपासाठी प्राधान्याने कर्जपुरवठा करावा अशा सुचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. साधरण ६ कोटी शेतकऱ्य़ांकडेच केसीसी कार्ड आहे.

English Summary: Kisan Credit Card Holders amid COVID-19! Here’s How to Make KCC within few Seconds
Published on: 11 May 2020, 05:34 IST