Others News

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्डची योजना आणली होती. ही योजना १९९८ मध्ये सुरू करण्यात आली होती. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत याची माहिती पोहोचलेली नाही. या किसान क्रेडिट कार्डमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसह शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या अनेक अवजारे घेण्यासाठी, खाद्य, बियाणे, कीटकनाशके, आदी वस्तूंची खरेदी करण्यासाठी या कार्डचा उपयोग होत असतो.

Updated on 15 April, 2020 10:15 AM IST


शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्डची योजना आणली होती. ही योजना १९९८ मध्ये सुरू करण्यात आली होती परंतु बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत याची माहिती पोहोचलेली नाही. या किसान क्रेडिट कार्डमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसह शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या अनेक अवजारे घेण्यासाठी, खाद्य, बियाणे, कीटकनाशके, आदी वस्तूंची खरेदी करण्यासाठी या कार्डचा उपयोग होत असतो. नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मिळून या योजनेची सुरुवात केली होती. सध्या सरकारने कार्ड धारक शेतकऱ्यांसाठी नवनवीन ऑफर आणल्या आहेत.

काय होतो फायदा कार्डचा पैशाच्या वाटपाच्या पद्धती सोपे होतात.  प्रत्येक पिकाच्या कर्जासाठी अर्ज करण्याची गरज नाही.  शेतकऱ्यांसाठी व्याजचा भार कमी होतो, शिवाय कर्ज मिळण्याची हमी.   शेतकऱ्यांच्या निवडीप्रमाणे, उर्वरके खरेदी करण्यास मदत होते. डीलर्सकडून खरेदीवर सूट मिळते. कर्ज घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, ३ फोटो लागतील. जर तुम्हाला १ लाखापर्यंतचं कर्ज हवं तर गॅरेंटरची गरज नाही. पण, १ लाखापुढील कर्जासाठी तुम्हाला गॅरेंटर लागेल. एक गोष्ट लक्ष ठेवा प्रत्येक बँकेची कर्ज मर्यादा वेगळी असते. या किसान क्रेडीट कार्डद्वारे तुम्ही पेसै देखील काढू शकता. शिवाय एका वर्षात कर्जाची परतफेड केली तर ३ टक्क्यांची सूट मिळते. ५ वर्षात ३ लाखापर्यंत आत्पकालिन कर्ज घेऊ शकतात.

कोणत्या बँकामध्ये मिळते किसान क्रेडिट कार्ड
एनपीसीआय नॅशनल पेमेंट्स कॉपोरेशन ऑफ इंडिया रुपये किसान क्रेडिट कार्ड ऑफर करते. यासह नाबार्ड सोप्या अटींवरती कर्ज देते. एसबीआय, बॅक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय मधूनही किसान क्रेडिट कार्ड मिळते.
अलाहाबाद बँक – किसान क्रेडिट कार्ड (केसीसी)
आन्ध्र बँक – एबी किसान ग्रीन कार्ड
बँक ऑफ बडोदा – बीकेसीसी (बीकेसीसी)
बँक ऑफ इंडिया – किसान समाधान कार्ड
कॅनरा बँक – केसीसी
कॉरपोरेशन बँक – केसीसी
देना बँक – किसान गोल्ड क्रेडिट कार्ड
ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स – ओरिएन्टल ग्रीन कार्ड (ओजीसी)
पंजाब नॅशनल बँक – पीएनबी कृषि कार्ड
स्टेट बँक ऑफ हैदराबाद – केसीसी
स्टेट बँक ऑफ इंडिया - केसीसी
सिंडिकेट बँक – एसकेसीसी
विजया बँक – विजया किसान कार्ड
आयसीआयसीआय बँक, याशिवाय जवळच्या बँकेशी तुम्ही संपर्क साधल्यास तुम्हाला अधिक माहिती मिळेल.

किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांचे कर्ज ४ टक्के दराने देण्यात येईल, अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली होती. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ४ टक्के दराने कर्ज मिळेल. शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज परत केले तर व्याज ३ टक्क्यांपर्यंत माफ केले जाईल. कर्जफेडीस जर उशिर झाला तर बँक ७ टक्के दर आकारेल. शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज परत केले तर कर्ज मर्यादा ३ लाखांपर्यंत वाढेल. दरम्यान जर तुम्ही १.६० हजार रुपयांचे कर्ज घेत असाल तर तुम्हाला तारण देण्याची गरज नाही.

 

किसान क्रेडिट कार्ड कसे मिळवावे :
आपल्या नजीकच्या पब्लिक सेक्टर बँकेस भेट द्या आणि तपशील मिळवा. पात्र असलेल्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड आणि एक पासबुक मिळेल. त्यामध्ये नाव, पत्ता, जमिनीच्या मालकीचे (स्वामित्वाचे) विवरण, कर्ज घेण्याची सीमा, कायदेशीर मान्यता काळ, धारकाचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो ज्याचा उपयोग ओळख पत्र आणि नेहमीच्या व्यवहाराची नोंद करण्याची सोय असे दोन्ही हेतू साध्य

क्रेडिट कार्डच्या कर्जासाठी लागणारी कागदपत्रे :
क्रेडिट कार्ड कर्जाचा अर्ज आपल्या स्वाक्षरीसह , आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, आदी. अर्जदाराचा राहण्याचा पत्ता, सातबारा उतारा किंवा शेत जमीन कसण्यासाठी घेतली असल्यास त्याचे प्रतिज्ञापत्र, पासपोर्ट साईज फोटो, कर्जासाठी तुम्ही थेट बँकेत जाऊ शकता. बँकेतील अधिकाऱ्यांकडून तुम्ही माहिती मिळवू शकता. त्याच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला ते कागदपत्र सांगतील. ती कागदपत्रे आपण जमा करु दिल्यास बँक आपल्याला कर्जाची पुर्तता करेल. स्टेट बँकेतून जर तुम्ही कार्ड घेत असाल तर तुम्ही ऑनलाईनही यासाठी अर्ज करु शकता. https://sbi.co.in/ या संकेतस्थळावर गेल्यास आपल्याला अर्ज मिळेल. 

जर तुम्ही किसान योजनेचे (PM-KISAN) लाभार्थी असाल तर तुम्हाला क्रेडिट कार्ड बनवण्यास फार सोपं आहे. यासाठी तुम्ही पीएम किसान योजना च्या पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर जा. त्यानंतर किसान क्रेडिट कार्डच्या अर्जाचा फार्म डाऊनलोड करु शकता. हा पर्याय वेबसाईटच्या होमपेजवर दिसेल. Download KCC form असं यावर लिहिलंल असेल. याशिवाय तुम्ही www.argicoop.gov.in यावरपण डाऊनलोड करू शकता.

English Summary: KCC : buy Fertilizers and pay through kisan credit card, know more benefits
Published on: 15 April 2020, 10:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)