देशात अलीकडे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, इलेक्ट्रिक वाहनांसमवेतच सीएनजी गाड्यांची देखील खपत अधिक होत असल्याची माहिती समोर येत आहे. देशात सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आकाशाला गवसणी घालत असल्याने हा बदल नमूद करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
आधीच पेट्रोल-डिझेलच्या किमती मध्यमवर्गीय लोकांच्या आवाक्याबाहेरच्या असतानाचं रशिया आणि युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धामुळे यात अजून मोठी वाढ होणार असल्याची शक्यता तज्ञाकडून वर्तविण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढच होत आहे म्हणूनच की काय आता लोक सीएनजी गाड्या खरेदी करण्याकडे वळले आहेत. भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्यांनी आता आपल्या गाड्या सीएनजी वैरिएंटमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.
मारुती सुझुकी ही देखील देशातील अग्रगण्य मोटोकॉर्प कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीदेखील मागणी लक्षात घेता सीएनजी गाड्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करत आहे. या कंपनीची मारुती सुझुकी अल्टो गाडी कंपनीने सीएनजी वैरिएंट मध्ये उपलब्ध करून दिली आहे. मध्यमवर्गीय लोक या गाडीला विशेष पसंत करतात, या गाडीला आपल्या देशात फॅमिली कार म्हणून संबोधले जाते. या गाडीची किंमत मध्यमवर्गीय लोकांच्या खिशाला झेपणारी असल्याने तसेच गाडीचे मायलेज आणि लुक भन्नाट असल्याने या गाडीची विशेष मागणी असते.
मारुती सुझुकी अल्टो 800 LXI S-CNG या मारुती सुझुकीच्या गाडीची एक्स शोरूम किंमत 4.89 लाख रुपये एवढी आहे. मित्रांनो जर आपल्याकडे एवढी मोठी रक्कम उपलब्ध नसेल तर आपण पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट भरून ही कार खरेदी करू शकता. ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, एवढे कमीत कमी डाऊन पेमेंट भरल्यानंतर आठ रुपये टक्के व्याजदराने पाच वर्षासाठी 9895 रुपये मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
हेही वाचा:-
Published on: 12 March 2022, 03:40 IST