Others News

सध्या पेट्रोलचे भाव प्रचंड प्रमाणात वाढल्याने दुचाकी वापरणे कठीण झाले आहे. निव्वळ दुचाकीस नाही तर चारचाकी वाहने सुद्धा परवडेनासे झाले आहेत. त्यामुळे देशातील लोकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

Updated on 09 February, 2022 12:23 PM IST

सध्या पेट्रोलचे भाव प्रचंड प्रमाणात वाढल्याने दुचाकी वापरणे कठीण झाले आहे. निव्वळ दुचाकीस नाही तर चारचाकी वाहने सुद्धा परवडेनासे झाले आहेत. त्यामुळे देशातील लोकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे  मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

त्यामुळे वेगवेगळ्या कंपन्या या इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करत आहेत. दुचाकींचा विचार केला तर यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ची मागणी खूप वाढली आहे.ऑटोक्षेत्रातील  मोठमोठ्या कंपन्या आता उत्तम वैशिष्ट्यांसह इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणत आहेत. या पार्श्वभूमीवर एलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रँड एएमओ इलेक्ट्रिक बाइक ने आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक जॉन्टी प्लस लॉंच केलीआहे. या स्कूटर मध्ये उत्तम प्रकारची कामगिरी आणि सुरक्षेची देखील काळजी घेण्यात आली आहे. या लेखात आपण या ई स्कूटरचे वैशिष्ट्ये जाणून घेऊ.

 जॉन्टी प्लस स्कूटर ची किंमत

एएमओ इलेक्ट्रिक बाइक्सनेएक लाख दहा हजार 460 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये जॉन्टी प्लस ईस्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरवर ग्राहकांना तीन वर्षाची वारंटी मिळणार असून ही पाच कलर व्हेरिअन्ट मध्ये उपलब्ध आहे. ही इलेक्ट्रिक बाइक 120 किमी पेक्षा जास्त धावू शकते. या स्कूटरचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या स्कूटरला शंभर टक्के चार्जिंग होण्यासाठी फक्त चार तास लागतात. 

या इलेक्ट्रिक स्कूटर ची वैशिष्ट्य म्हणजे उच्च कार्यक्षमता असलेली मोटर, क्रूज कंट्रोल स्विच, इलेक्ट्रॉनिक असिस्टेड ब्रेकिंग सिस्टम आणि विशेष म्हणजे चोरी विरोधी असलेल्याअलार्मसिस्टीम होय त्यासोबतच टेलिस्कोपिक फॉर्क सस्पेन्शन,हाय ग्राउंड क्लिअरन्स,  साईड स्टॅन्डसेंसर, सेंत्रल लॉकिंग,फ्रंट डिस्क ब्रेक, इंजिन किल स्विच यांचा समावेश आहे.

English Summary: jonty plus electric scooter launch this scooter charge 1 hour in go 120 km on single charging
Published on: 09 February 2022, 12:23 IST