राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नागपुर येथे ७८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे, ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत.
यामध्ये हार्टतज्ञ, रेडिओ लॉजिस्ट, बाल रोगतज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, भूलतज्ञ, फिजिशियन, ऑप्टोमेट्रिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, लॅब टेक्निशियन, समुपदेशन, पॅरा मेडिकल वर्कर, वैद्यकिय अधिकारी, आदिवासी पर्यवेक्षक, सिस्टर इन्चार्ज, स्टाफ नर्स आदी पदे भरण्यात येणार आहेत.
या पदासाठी तुम्हाला १५,५०० ते १,२५००० हजार रुपयापर्यंत मानधन मिळेल. या पदासाठी आवश्यक अहर्तेनुसार तुम्हाला शैक्षणिक कागदपत्रे अर्जासोबत सादर करावे लागतील.
यामध्ये पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका, जातीचा दाखला, संगणक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, तसेच ओळखपत्र, फोटो व अर्जाचे शुल्क भरल्याबाबत पावती आदी कागदपत्रे सादर करावे लागतील. हे अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिव्हील लाईन नागपूर येथे जमा करायचे आहेत.
या पदासाठी शैक्षणिक अहर्ता तसेच इतर माहिती नागपूर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महत्वाच्या बातम्या
कामाची बातमी! मोदी सरकारच्या 'या' योजनेमार्फत सर्व्यांना मिळणार वार्षिक 36 हजार; वाचा या विषयी
Health: नेहमी वाढतो का ब्लड प्रेशर? मग करा हे योग आणि मिळवा कायमचा आराम
Published on: 07 May 2022, 11:28 IST