Others News

यावर्षी जवळजवळ साठ टक्के कंपन्या नोकरभरतीची प्रक्रिया राबवणार असल्यामुळे बेरोजगारांच्या हाताला काम मिळून नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होतील, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे. कोरोनामुळे गेल्या मागील सव्वा वर्षापासून लॉक डाऊन आणि कठोर निर्बंधांमुळे उद्योग जगताला मोठा फटका बसला.

Updated on 17 June, 2021 2:11 PM IST

 यावर्षी जवळजवळ साठ टक्के कंपन्या नोकरभरतीची प्रक्रिया राबवणार असल्यामुळे बेरोजगारांच्या हाताला काम मिळून नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होतील, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे. कोरोनामुळे गेल्या मागील सव्वा वर्षापासून लॉक डाऊन  आणि कठोर निर्बंधांमुळे उद्योग जगताला मोठा फटका बसला.

 त्यामुळे बर्‍याच उद्योगांनी कामगार कपात केली. त्यावर लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या व काहींना वेतन कपातीचा सामना करावा लागत आहे. परंतु ही वाईट परिस्थिती आता संपणार असून नोकरी शोधणाऱ्या तरुणांना आता रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील असे मर्कर मेटल या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे.

 मर्कर मेटल ने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, यावर्षी 60 टक्के कंपन्या नोकर भरती प्रक्रिया राबवणार असून त्यातील अनेक कंपन्यांनी एप्रिल-मे पासूनच भरती प्रक्रिया सुरू केली असून वर्च्युअल माध्यमातून मुलाखती घेतल्या जात आहेत. येणाऱ्या जुलै महिन्यापासून ही भरती प्रक्रिया वेगाने राबवण्यात येणार आहे असे अहवालात म्हटले आहे.

या अहवालात म्हटले आहे की, कोरोना ची दुसरी लाट ओसरत  असल्यामुळे परिस्थिती लवकरच सामान्य होईल अशी आशा कंपनींना वाटते. म्हणूनच कंपन्या कर्मचाऱ्यांची भरती करीत आहे. त्यामुळे क्षमता आणि योग्यता असलेल्या व्यक्तींना येत्या काही महिन्यांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतील. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात प्रावीण्य असलेल्या अथवा एखाद्या विशिष्ट कामात लपून मिळवलेल्या व्यक्तींना चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत..

English Summary: job chances
Published on: 17 June 2021, 02:11 IST