Others News

जिओ एक सगळ्यात पसंतीचे नेटवर्क असून स्वातंत्र दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त एक खास ऑफर जिओनी आणली असून त्यामाध्यमातून फ्री कॉलिंग, एसएमएस डेटा व्यतिरिक्त बरेच फायदे वापरकर्त्याला मिळणार आहेत. या ऑफरचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, 2999 रुपयांचा रिचार्ज वर 100% व्हॅल्यू बँक फायदे मिळतील एवढेच नाही तर ग्राहकाला Netmeds, AJIO,Ixigo आणि 75 जीबी 4जी डेटा साठी रीडिंम कुपन देखील मिळणार आहे. या ऑफरचे कुपन 72 तासांच्या आत सदस्यांच्या माय जिओ ॲप वर जमा केले जाणार आहेत.

Updated on 12 August, 2022 3:44 PM IST

नक्की वाचा:7th Pay Commission: सणासुदीच्या मुहूर्तावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'ही' आहे आनंदाची बातमी, वाचा तपशील

जिओचा जो काही 2999 रुपयांचा प्लॅन आहे, त्या प्लॅनचे सगळे दूरसंचार फायदे कोणताही नेटवर्कवर अमर्यादित विनामूल्य कॉलिंगसह दररोज अडीच जीबी डेटा मिळेल. एवढेच नाही तर 75 जीबी डेटा वेगळा दिला जाणार आहे.

त्यासोबतच दररोज शंभर एसएमएस + डिस्ने+ हॉटस्टार मोबाईलचे सबस्क्रीप्शन एक वर्षासाठी दिले जात आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 365 दिवसांची असून वापरकर्त्यांना  जिओ एप्स आणि सेवाचाही प्रवेश मिळू शकणार आहे.

नक्की वाचा:भावांनो संधीचे करा सोने! विविध बॅंका आणि संरक्षण दलात नोकरीची बंपर संधी, 22 ऑगस्ट पर्यंत करा अर्ज

अजून मिळणारे जास्तीचे फायदे

1- या प्लान मध्ये वापरकर्त्याला 75 जीबी हायस्पीड डेटा मिळेल.

2- नेट्मेड्स  कुपनच्या मदतीने वापरकर्त्याला 25 टक्क्यांची सूट मिळेल. म्हणजे ही सूट एक हजार आणि त्यावरील खरेदी वर उपलब्ध आहे.

3- तसेच ग्राहकांना एक्झिगो वर 750 रुपयांची सवलत मिळणार असून ही सवलत 4500 रुपये आणि त्याहून अधिक खर्चावर मिळेल.

4-Ajio 2990 किंवा त्याहून अधिक खर्च करणाऱ्यांवर एक हजाराची सूट मिळेल.  हे सर्व कुपन वापरकर्त्यांच्या  माय जिओ ॲप मध्ये उपलब्ध असतील.

5- ग्राहक 31 डिसेंबर पर्यंत Ixigo कुपन वापरू शकतात आणि Ajio कुपन वापरण्याची वेळ 31 ऑक्‍टोबरपर्यंत असून नेटमेड्स कुपन 31 ऑक्टोबरपर्यंत वापरता येणार आहे.

नक्की वाचा:पोस्टा संगे बिजनेस! अल्पशा गुंतवणुकीतून सुरु करा व्यवसाय आणि कमवा बंपर नफा

English Summary: jio declare one of the attractive offers for jio user give more benifit to users
Published on: 12 August 2022, 03:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)