राज्यातील मुंबई शहरात एक मोठा निर्णय लागू करण्यात आला आहे. आपल्याकडे काही लोक असे आहेत जे बस, ट्रेन आणि सार्वजनिक ठिकाणी फोनवर मोठ्या आवाजात गाणी ऐकतात. यामुळे याचा त्रास इतर लोकांना होत असतो. हे लोक फोनवरही जोरात बोलतात. अशा लोकांसाठी मोबाईल वापराबाबत एक नवा नियम आला आहे.
ज्यामध्ये तुम्ही बसमध्ये प्रवासादरम्यान फोनवर मोठ्याने बोलल्यास किंवा हेडफोनशिवाय व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला 5000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. तसेच, 3 महिन्यांची शिक्षादेखील होऊ शकते. यामुळे आता अशा गोष्टींना आळा बसणार आहे. हा नियम बेस्ट अर्थात बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टने लागू केला आहे.
या नियमांतर्गत बसमध्ये हेडफोनशिवाय व्हिडिओ पाहण्यावर बंदी घालण्यात आली असून, नियम मोडल्यास तुरुंगवासही होऊ शकतो. नव्या परिपत्रकानुसार आवाजाची डेसिबल पातळी कमी ठेवण्यासाठी नवा नियम आणण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही बस प्रवाशाला फोनवर मोठ्याने बोलू दिले जाणार नाही.
जांभळाला किलोला मिळाला ६०० ते ७०० रुपयांचा दर, मागणी वाढली..
तुम्हाला संगीत ऐकायचे असल्यास, हेडफोन सोबत घेऊन जावे लागणार आहे. बेस्टने या आठवड्यापासून मोबाईलच्या स्पीकरवर व्हिडिओ पाहण्यास किंवा गाणी वाजविण्यास बंदी घातली आहे. यासंदर्भातील अधिसूचना 25 एप्रिल रोजी जारी करण्यात आली होती.
मोचा' चक्रीवादळ किनारपट्टीला धडकणार, ११ ते १५ मे पाऊस पडणार
दरम्यान, नव्या नियमाबाबत जनजागृती करण्यासाठी बसेसमध्ये सूचना चिकटविण्याचे काम सुरू झाले आहे. हा नवा नियम मुंबई आणि आजूबाजूच्या शहरातील बस प्रवाशांना लागू होणार आहे. यामुळे आता काळजी घ्यावी लागणार आहे.
पीएम किसानच्या 14 व्या हप्त्याची रक्कम लवकरच मिळणार, ही 2 महत्त्वाची कामे लवकर उरका
कर्नाटकमध्ये मोफत सिलेंडर, व्याजमुक्त कर्ज, भाजपचे शेतकऱ्यांना अच्छे दिन?
पाऊस घेणार विश्रांती, शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा, पंजाब डख यांनी सांगितली तारीख
Published on: 03 May 2023, 11:36 IST