१.पुर्वहंगामी लागवड झालेल्या पिकाला दर २-३ दिवसांनी सौम्य पाणी द्या. (पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी असल्याने आहे तेवढे पाणी पुरवुन द्या.)२.कोणत्याही परिस्थितीत धुळ पेरणी करू नका.अवकाळी पाऊस दमदार नाही, व येणाऱ्या मान्सूनच्या पावसाचा भरवसा नाही. त्यामुळे धुळ पेरणीतील बियाणे वाफलुन वाया जाण्याची शक्यता अधिक आहे.विशेषतः कापुस पिकासाठी खालील गोष्टीना प्राधान्य द्या ३.कापुस वाण निवडताना आजिबात चुक करू नका. खुप मोठ्या बोंडांच्या जातींमागे लागु नका.
कारण बहुतेक मोठ्या बोंडांच्या जाती या उशिरा येणाऱ्या असतात. व एकुण पाऊसमान बघता अशा जाती आपणांस दगा देण्याचा जास्त संभव आहे.४. जात निवडताना कमी पाण्यात, लवकर येणारी, हमखास कापुस उतारा देणारीचं निवडा ५.ज्या वर्षी पाऊसमान कमी असते त्या वर्षी कापुस पिकावर रसशोषक किडींचा जास्त प्रादुर्भाव होतो, व आपला कीटकनाशके फावरणीवर भरमसाठ खर्च येतो.अशा वेळी रसशोषक किडींचा सर्वोत्तम प्रतिकारशक्ती असणारे वाणचं निवडा.६.कापूस वेचणी करणाऱ्या मजुरांच्या सोईसाठी शेती नियोजन न करता जास्तीत जास्त उत्पादन देणारे वाणचं निवडा.
६.कापूस वेचणी करणाऱ्या मजुरांच्या सोईसाठी शेती नियोजन न करता जास्तीत जास्त उत्पादन देणारे वाणचं निवडा.७.जमीन खुप तापलेली आहे. त्यामुळे चांगला पाऊस (४ इंच ओल) झाल्याशिवाय कापुस लागवड करू नका.८.कोणत्याही परिस्थितीत BT3, RR अशा फसव्या जाहिरातींना भुलून अप्रमाणित वाणांची (illegal) निवड करू नका, त्याऐवजी सरकार मान्यता प्राप्त बोलगार्ड II या सरकारमान्य तंत्रज्ञानांनी युक्त वाणचं निवडा.९.घेतलेल्या बियाण्याचे बील जपुन ठेवा. लागवडी सोबत पाभरीने (तिफण) खत पेरा, आपण दिलेले खत बियापासून ४-५ बोटे लांब पडेल याची खात्री करा.
कोणत्याही परिस्थितीत BT3, RR अशा फसव्या जाहिरातींना भुलून अप्रमाणित वाणांची (illegal) निवड करू नका,त्याऐवजी सरकार मान्यता प्राप्त बोलगार्ड II या सरकारमान्य तंत्रज्ञानांनी युक्त वाणचं निवडा.घेतलेल्या बियाण्याचे बील जपुन ठेवा. लागवडी सोबत पाभरीने (तिफण) खत पेरा, आपण दिलेले खत बियापासून ४-५ बोटे लांब पडेल याची खात्री करा. खत पेरून देता येणे शक्य नसेल तर ते टाकल्यावर जमिनीआड करा. उघड्यावर पडलेले खत म्हणजे आपले पैसे वाया गेले, हे ध्यानात घ्या.
शिंदे सर
भगवती सीड्स चोपडा
9822308252
Published on: 19 June 2022, 06:05 IST