पॅन कार्ड म्हणजे परमनंट अकाऊंट नंबर हे भारतात एक महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणून ओळखले जाते. पॅन कार्डचा उपयोग मुख्यतः वित्तीय कामात जास्त केला जातो. तसेच याचा उपयोग अनेक सरकारी कामांमध्ये केला जातो. पॅन कार्ड बँकेत अकाउंट खोलन्यापासून ते एटीएम तसेच क्रेडिट कार्ड प्राप्त करण्यासाठी एक महत्वाचे डॉक्युमेंट आहे. परंतु अनेकदा असे महत्त्वाचे डॉक्युमेंट आपल्याला ओरिजनल आहे की डुप्लिकेट हेच समजत नाही, पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याद्वारे अगदी सहज रित्या जाणून घेऊ शकता की पॅन कार्ड ओरीजनल आहे की डुप्लीकेट.
पॅन कार्डवर असलेल्या क्यूआर म्हणजेच क्विक रिस्पॉन्स कोड द्वारे हे जाणून घेणे शक्य झाले आहे. ही संपूर्ण प्रवास करण्यासाठी पॅन कार्ड आणि मोबाईल ची आवश्यकता भासेल. मित्रांनो लक्षात ठेवा मोबाईलचा कॅमेरा हा कमीत कमी 12 मेगापिक्सल असला पाहिजे त्याच्या पेक्षा खालचा कॅमेरा हे काम करू शकत नाही. तसेच आपणास भारत सरकारचा आयकर भागाची ऍलिकेशन देखील मोबाईल मध्ये डाउनलोड कराव लागेल.
कसे ओळखणार पॅन कार्ड ओरिजनल आहे का डुप्लिकेट
•मित्रांनो जर आपल्यालाही जाणुन घ्यायचे असेल तुमच्या मोबाईलमध्ये अँप स्टोर किंवा h'प्ले स्टोअर' वर जा आणि 'पॅन क्यूआर कोड रीडर' शोधा.
•हे अँप डाउनलोड करा, जे की NSDL ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने विकसित केले आहे.
•एकदा तुम्ही 'पॅन क्यूआर कोड रीडर' अॅप डाउनलोड केल्यानंतर ते उघडा.
•अॅप लोड झाल्यानंतर, तुम्हाला कॅमेरा व्ह्यूफाइंडरवर हिरवा प्लस-सारखा ग्राफिक दिसेल.
•तुम्हाला तुमच्या कॅमेऱ्यात तपासायचे असलेल्या पॅन कार्डचा QR कोड दाखवा.
•कॅमेरा QR कोड शोधताच, तुम्हाला फोनमधील बीप आवाज आणि कंपन जाणवेल.
•यानंतर पॅन कार्डचा तपशील तुमच्या डोळ्याला दिसेल. अॅपमध्ये दाखवलेले तपशील पॅन कार्डशी जुळतात का ते तपासा. जर ते थोडे वेगळे असेल तर पॅन कार्ड ओरिजिनल नाही.
•जर आपण हे चेक केल आणि जर तुमच्या स्वतःच्या पॅन कार्डमध्ये वेगळी माहिती दिसली, तर तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाइटवरून नवीन पॅन कार्ड घ्यावे लागेल.
Published on: 19 December 2021, 10:51 IST