Others News

Iphone 13 Pro: Apple ही देशातील एक प्रमुख मोबाईल निर्माती कंपनी आहे. आता Apple नवीन iPhone लाँच करणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टमध्ये झळकत आहे. कंपनी नवीन सीरिजचे नाव iPhone 14 ठेवणार आहे. यामध्ये अनेक बदल करण्यात येणार आहेत. iPhone 14 लाँच होण्यापूर्वीच iPhone 13 ची किंमत लक्षणीयरीत्या खाली आली आहे.

Updated on 03 July, 2022 5:33 PM IST

Iphone 13 Pro: Apple ही देशातील एक प्रमुख मोबाईल निर्माती कंपनी आहे. आता Apple नवीन iPhone लाँच करणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टमध्ये झळकत आहे. कंपनी नवीन सीरिजचे नाव iPhone 14 ठेवणार आहे. यामध्ये अनेक बदल करण्यात येणार आहेत. iPhone 14 लाँच होण्यापूर्वीच iPhone 13 ची किंमत लक्षणीयरीत्या खाली आली आहे.

आता जर तुम्हाला कोणी सांगितले की iPhone 13 Pro Max फक्त 20 हजार रुपयांमध्ये मिळू शकतो, तर तुमचा विश्वास बसेल का? कदाचित बसणार नाही. पण हे खरं आहे. सुमारे दीड लाखांचा iPhone 13 Pro Max अवघ्या 20 हजार रुपयांमध्ये मिळू शकतो. मात्र इथे आम्ही एक गोष्ट नमूद करू इच्छितो की, प्रत्येकाला ही ऑफर मिळणार नाही. 

तुम्हालाही ही सूट मिळवायची असेल तर तुम्हाला फेसबुक मार्केट प्लेसवर जावे लागेल. हा फोन फेसबुक मार्केट प्लेसवरून अवघ्या 20 हजार रुपयांमध्ये खरेदी करता येईल.  तर या आयफोनची एमआरपी 1,59,900 रुपये आहे. घरबसल्या ऑनलाइन ऑर्डर करता येईल. ऑर्डर केल्यानंतर फोन थेट घरी पोहोचवला जाईल.

मित्रांनो लक्षात घ्या की, प्रत्येकाला ही ऑफर मिळणार नाही.  केवळ निवडक लोकांनाच या ऑफरचा लाभ मिळू शकणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार केवळ दिल्ली-एनसीआरचे युजर्स हा फोन खरेदी करू शकतात. युजरने यासंदर्भात फेसबुक मार्केट प्लेसवर एक जाहिरातही शेअर केली आहे.  या जाहिरातीत iPhone 13 Pro Max देखील दाखवण्यात आला आहे. वापरकर्त्याचा दावा आहे की, त्याच्याकडे आयफोन 13 प्रो चा खूप मोठा स्टॉक आहे. म्हणूनच त्याला ते लवकरच विकायचे आहे.

मित्रांनो स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीतही iPhone 13 Pro मॅक्सला जोडच नाही. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, या आयफोन मध्ये सुपर रेटिना XDR डिस्प्ले iPhone 13 Pro Max मध्ये उपलब्ध आहे. तसेच यामध्ये A15 बायोनिक चिप वापरण्यात आली आहे. 6.7 इंच डिस्प्ले साईजमुळे तुम्हाला चित्रपट किंवा कोणताही व्हिडिओ पाहताना एक वेगळा अनुभव मिळेल.

हे व्हिडिओ दरम्यान ऑटो फोकस मोडवर कार्य करते. याला व्हिडिओ प्लेबॅकसह 28 तासांची बॅटरी लाइफ मिळते. निश्चीतच आयफोन 13 प्रो हा आयफोनचा सर्वात बेस्ट फोन आहे. मित्रांनो येथे नमूद केलेली ऑफर आम्ही पडताळून बघितलेले नाही. त्यामुळे मोबाइल खरेदी करताना सर्वप्रथम याची पडताळणी करणे अनिवार्य राहणार आहे. खात्री केल्यानंतरच आयफोन खरेदी करावा.

English Summary: iphone 13 pro is now available at 20000
Published on: 03 July 2022, 05:33 IST