जर आपणासही गुंतवणूक करायची असेल, आणि प्रश्न पडला असेल की, गुंतवणूक नेमकी कुठे करायची? तर आम्ही आज आपल्यासाठी विशेष माहिती घेऊन आलो आहोत. भारतात गुंतवणूक करण्यासाठी सर्व्यात सुरक्षित जागा आहे, एलआयसी आणि पोस्ट ऑफिस. आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका अशाच महत्वाच्या योजनेविषयी जाणुन घेणार आहोत, या योजनेत गुंतवणूक ही सुरक्षित असते. तसेच या योजनेतून चांगला परतावा देखील मिळणारा आहे. पोस्ट ऑफिसच्या ह्या स्कीमचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, ह्या योजनेत आपल्याला फक्त 400 रुपयाचीच गुंतवणूक ही करायची आहे आणि यातून तब्बल 1 कोटीचा परतावा हा मिळणार आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास आपणांस चांगला रिटर्न मिळू शकतो, चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणुन घेऊया या योजनेविषयी.
जाणुन घ्या पोस्ट ऑफिस च्या या योजनेविषयी
जर आपल्याला लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिसची ही योजना आपल्यासाठी एक उत्तम योजना ठरू शकते. पोस्ट ऑफिस च्या योजनेचे नाव आहे पी पी एफ. पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रोविडेंट फंड होय. पब्लिक प्रोविडेंट फंड या योजनेत गुंतवणुकीवर 7.1 टक्के चक्रवाढ व्याज देते. ही योजना पंधरा वर्षाची आहे. असे असले तरी आपण ही योजना अजून पाच वर्षासाठी वाढवू शकता. या योजनेचे पंधरा वर्षे पूर्ण झाले असता आपणास वाटले की आपणास पैशांची आवश्यकता नाहीये तर आपण योजना अजून पाच वर्ष वाढवू शकता. या वाढवलेल्या पाच वर्षात देखील आपणास चक्रवाढव्याजचा लाभ भेटेल.
दिवसाला चारशे रुपयाची गुंतवणूक
या योजनेत वर्षाकाठी जास्तीत जास्त दीड लाख रुपये इन्वेस्ट केले जाऊ शकतात. आपण या योजनेत वर्षाकाठी एकदम दीड लाख रुपये जमा करण्याऐवजी दिवसाला चारशे रुपये किंवा मासिक बारा हजार पाचशे रुपये जमा करून चांगला मोठा रिटर्न कमवू शकता. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, भारत सरकारच्या आयकर अधिनियमच्या कलम 80C द्वारे आपण आपल्या प्रॉव्हिडंट फंडच्या अकाउंट वर करात सवलत देखील प्राप्त करू शकता.
या योजनेत मिळणार एक करोड रुपये
या योजनेच्या अंतर्गत जर आपण मासिक बारा हजार पाचशे म्हणजे वर्षाला दीड लाख रुपये गुंतवणूक करतात, आणि आपण ही गुंतवणूक जर सलग पंचवीस वर्षे चालू ठेवणार, तर आपले एकूण 37.50 लाख रुपये जमा होतील, यावर आपणास 7.1 टक्के व्याज दराने पैसे मिळतील. योजना पूर्ण झाल्यावर आपणास 1.03 करोड रुपये मिळतील, यावर आपणास 62.50 लाख रुपये व्याज मिळेल.
Published on: 23 December 2021, 09:20 IST