सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिसच्या (post office) अनेक योजना आहेत, ज्यामधून तुम्हाला चांगला नफा मिळतो. यासह आपण पाहिले तर पोस्ट ऑफिसच्या योजनेत मासिक उत्पन्न योजना हा एक चांगला पर्याय आहे.
पोस्ट ऑफिसच्या योजनेत तुम्ही सुरक्षित गुंतवणूक करू शकता. मंथली इन्कम योजना खात्यात एकदाच गुंतवणूक करावी लागते आणि पाच वर्षांनंतर मासिक उत्पन्नाची हमी मिळते. तुम्ही अविवाहित असाल तर तुम्ही एकाच वेळी जास्तीत जास्त साडेचार लाख रुपये जमा करू शकता.
वार्षिक 29,700 रुपये व्याज
मंथली इन्कम योजना कॅल्क्युलेटरनुसार आपण पाहिले तर जर एखाद्या व्यक्तीने साडेचार लाख रुपयांच्या एकरकमी ठेवीसह हे खाते उघडले तर मॅच्युरिटीनंतर पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी २९,७०० रुपयांच्या व्याजातून उत्पन्न मिळेल.
म्हणजेच दर महिन्याला तुम्हाला व्याज म्हणून 2,475 रुपये मिळतील. अशा प्रकारे पाच वर्षांत तुम्हाला एकूण 1,48,500 रुपये व्याज मिळेल. पोस्ट ऑफिस एमआयएसवर सध्या 6.6 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे.
शेतकऱ्यांसाठी 'हे' खत ठरतंय वरदान; मिळतोय भरपूर नफा
योजनेची वैशिष्ट्ये
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजना योजनेत किमान एक हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून खाते उघडता येते. सिंगल आणि जॉइंट (Single and joint) अशी दोन्ही खाती उघडता येतात. तुम्ही एका खात्यात जास्तीत जास्त साडेचार लाख रुपये आणि संयुक्त खात्यात ९ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
इंडिया पोस्टच्या म्हणण्यानुसार, एमआयएसमध्ये दरमहा व्याज दिले जाते. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो.
पशुपालकांसाठी दिलासा देणारी बातमी; सरकार 2 लाख रुपयांपर्यंत करणार मदत
गुंतवणूक केव्हाही थांबवता येते
एमआयएसचा मॅच्युरिटी कालावधी पाच वर्षांचा आहे. ती तुम्ही केव्हाही थांबवू शकता. डिपॉझिटच्या (deposite) तारखेपासून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही पैसे काढू शकता. नियमानुसार एक वर्ष ते तीन वर्षांच्या दरम्यान पैसे काढले तर ठेवीच्या रकमेच्या 2 टक्के रक्कम परत मिळणार आहे.
जर तुम्ही खाते उघडल्यानंतर 3 वर्षानंतर मॅच्युरिटीपूर्वी कधीही पैसे काढले तर तुमच्या ठेवीतील 1% रक्कम कापून परत मिळेल. मॅच्युरिटी म्हणजेच पाच वर्षे पूर्ण झाल्यावर आणखी ५-५ वर्षांसाठी ती वाढवता येते.
महत्वाच्या बातम्या
एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत एकदाच गुंतवणूक करा; आयुष्यभर पेन्शन राहणार सुरू
आज बुधाची बदलणार चाल; पाहा तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 10 म्हशींची डेअरी खोलण्यासाठी सरकार करणार ७ लाख रुपयांपर्यंत मदत
Published on: 12 September 2022, 12:00 IST