मित्रांनो जर आपल्याला देखील वृद्धापकाळात पेन्शन हवी असेल मात्र आपण सरकारी नोकरदार नाहीत तर आपल्य्साठी एलआयसी एक भन्नाट योजना घेऊन आली आहे. या योजनेद्वारे आपण म्हातारपणी पेन्शन प्राप्त करू शकता. एलआयसी वृद्धापकाळात लोकांना पेन्शन मिळावी या हेतूने एलआयसी सरल पेन्शन प्लॅन घेऊन आले आहे या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेसाठी केवळ एकदाच प्रीमियम भरावा लागतो आणि त्यानंतर वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बारा हजार रुपये पेन्शन एलआयसी द्वारे देण्यात येते. या पेन्शनचा पैसा आपणास आपल्या संपूर्ण आयुष्यभर मिळू शकतो चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या सरल पेन्शन योजनेचे फायदे आणि आपणास या योजनेसाठी किती गुंतवणूक करावी लागणार आहे.
एलआयसी सरळ पेन्शन योजना
एलआयसीची ही सरळ पेन्शन योजना ही एका व्यक्तीसाठी उपलब्ध असणार आहे अर्थात ही योजना कुठल्यातरी एका व्यक्तीशी संबंधित असणार आहे. ही पेन्शन योजनाधारक व्यक्ती जोपर्यंत जिवंत राहणार आहे तोपर्यंत त्यांना या योजनेअंतर्गत पेन्शन मिळत राहील त्यानंतर त्यांच्या वारसदारांना केवळ बेस प्रीमियम दिला जाणार आहे. एलआयसी सरल पेन्शन योजना ही जॉइंट लाइफ साठी देण्यात येते अर्थातच या योजनेअंतर्गत पती आणि पत्नी पैकी जो जास्त कालावधी पर्यंत जिवंत राहणार आहे त्या व्यक्तीस पेन्शन मिळत राहील जेव्हा पती आणि पत्नी दोघेही हयात नसतील तेव्हा त्यांच्या वारसदारांना केवळ बेस प्राईस दिले जाणार आहे.
एलआयसी सरल पेन्शन योजनेचे वैशिष्ट्य
•एलआयसी सरल पेन्शन योजना नामक एलआयसीची महत्त्वाकांक्षी पॉलिसी खरेदी करताच पेन्शन सुरू होते.
•एलआयसी सरल पेन्शन योजनेअंतर्गत पॉलिसीधारक व्यक्तीला पेन्शन महिन्याकाठी, तीन महिन्यानंतर, सहामाही, वार्षिक दिले जाते पॉलिसी धारकास हे ठरवण्याचा अधिकार असतो.
•एलआयसीची सरल पेन्शन योजना ऑनलाईन तथा ऑफलाईन दोन्ही प्रकारे घेतली जाऊ शकते. या योजनेसाठी 12 हजार रुपये वार्षिक एवढी कमीत कमी राशि गुंतवणूक म्हणून द्यावी लागते, यामध्ये मॅक्सिमम गुंतवणूक किती करायची असे नमूद केलेले नाही पॉलिसीधारक यामध्ये अनलिमिटेड पैसे गुंतवणूक करू शकतो.
•हि योजना 40 ते 80 वर्ष दरम्यान असलेल्या लोकांसाठी आहे. या पॉलिसीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे पॉलिसी सुरू झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी पोलिसी होल्डरला या पोलिसी साठी कुठल्याही वेळी लोन मिळू शकते.
Published on: 19 February 2022, 01:01 IST