Others News

Business Idea :- कमीत कमी गुंतवणुकीत चांगला आर्थिक नफा देणारा व्यवसाय शोधणे व तोच व्यवसाय सुरू करणे हे आजकालच्या युगात खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण अचानक कुठलाही व्यवसायामध्ये जास्त प्रमाणात गुंतवणूक करून जोखीम पत्करण्यापेक्षा कमीत कमी बजेटमध्ये चांगला व्यवसाय सुरू करणे खूप गरजेचे असते. अनेक प्रकारचे व्यवसाय आपल्याला कमीत कमी गुंतवणुकीत सुरू करता येतात व त्यातून आपल्याला लाखोंची कमाई देखील करता येते. याच अनुषंगाने आपण या लेखांमध्ये दीड ते दोन लाख गुंतवणूक करून खूप चांगल्या प्रकारे नफा मिळू शकणाऱ्या काही व्यवसायांची माहिती थोडक्यात पाहणार आहोत.

Updated on 29 August, 2023 2:10 PM IST

 कमी भांडवलात सुरु होणारे व्यवसाय

1- बेकरी शॉप- कमीत कमी गुंतवणुकीमध्ये आणि प्रचंड नफा मिळवण्यासाठी बेकरी व्यवसाय हा एक खूप चांगला व्यवसाय आहे. आजकालच्या कालावधीमध्ये केक आणि बेक केलेले पदार्थांचे खूप मोठी मागणी असून या व्यवसायामध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पैसा मिळवू शकतात. साधारणपणे दोन लाख रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही एक लहान जागेत किंवा भाड्याने जागा घेऊन देखील हा व्यवसाय सुरू करू शकतात. बेकरी उत्पादने बनवण्याकरिता जास्त खर्च येत नाही व त्या विकून मात्र चांगले पैसे मिळवता येतात.

2- केटरिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसाय- केटरिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट हा व्यवसाय तुम्हाला खूप चांगला पैसा मिळवून देऊ शकतो. या व्यवसायामध्ये लोक काही कार्यक्रमांचे आयोजन करतात. या कार्यक्रमांचे नियोजन आणि तर गोष्टींकरिता इतर व्यक्तींना त्या कार्यक्रमाचे सगळे सूत्र दिले जातात.

जर तुम्ही टीमवर्क करण्यामध्ये कुशल असाल तर तुमच्यासाठी हा व्यवसाय खूप चांगला आहे. त्यामध्ये तुम्ही अनेक प्रकारचे कंत्राट घेऊन  हा व्यवसाय करू शकतात. याकरिता तुमच्याकडे कुशल स्वयंपाकींची टीम असणे खूप गरजचे आहे. साधारणपणे दीड लाख रुपये गुंतवणूक करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

3- उपकरणे भाड्याने देण्याची सर्विस- हा देखील व्यवसाय खूप महत्त्वाचा असून ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये विविध गोष्टी भाड्याने देऊन तुम्ही चांगला पैसा मिळवू शकतात. यामध्ये तुम्ही बांधकामाचे साधने, इव्हेंट आयटम, शेतीसाठी लागणारी उपकरणे, वाहने किंवा इतर मौल्यवान वस्तू  तुम्ही भाड्याने देण्याचा व्यवसाय करून या माध्यमातून चांगला पैसा मिळवू शकता. साधारणपणे दोन लाख रुपयांपासून या व्यवसायाची सुरुवात करता येते.

4- टॅक्सी सेवा किंवा कार सेवा- तुमच्याकडे कार  असेल व तिचा वापर तुम्ही जास्त करत नसाल तर तुम्ही या माध्यमातून देखील चांगला पैसा मिळवू शकतात. शहरामध्ये तुम्ही ओला आणि उबेर सारख्या राईडशेअरिंग कंपन्याना तुमचे वाहन तुम्ही भाड्याने देऊ शकता किंवा महिन्याची ठराविक रक्कम ठरवून देऊ शकतात.

या माध्यमातून देखील तुम्हाला चांगला पैसा मिळू शकतो. तसेच तुमच्याकडे वाहन नसेल तर तुम्ही दोन लाख गुंतवणूक करून चांगले वाहन खरेदी करू शकता व अतिरिक्त पैसे कमवू शकता. तसेच इतर लोकांना देखील भाडेतत्त्वावर तुम्ही वाहन सुविधा पुरवू शकतात.

English Summary: Invest one and a half to two lakh rupees and start a business! You will earn well and get good profits.
Published on: 29 August 2023, 02:08 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)