सध्या एलआयसीच्या योजनांमध्ये गुंतवणूक (Investment) करणे हा भारतीयांमध्ये पैसे वाचवण्याचा लोकप्रिय मार्ग ठरत आहे. या योजनांमध्ये पैसा सुरक्षित देखील राहतो. भविष्यातील आर्थिक गरजांसाठी बचत करत असणाऱ्या लोकांसाठी ही योजना अत्यंत उपयोगी आहे.
LIC योजनेच्या गुंतवणुकीत (LIC Scheme Investments) कोणतीही जोखीम नसते आणि या योजनेत निश्चितच चांगला परतावा मिळतो. LIC आधार शिला योजना ही एक नॉन-लिंक्ड (Non-linked) वैयक्तिक जीवन विमा योजना आहे. जी खास महिला आणि मुलींसाठी बनविलेली आहे.
शेतकऱ्यांनो 'या' कारणाने दुधाची फॅट होते कमी; फॅट वाढविण्यासाठी वापरा हे तंत्र
योजनेची वैशिष्ट्ये
या योजनेत दररोज 29 रुपये गुंतवले तर तुम्हाला 4 लाख रुपये मिळतील. या विमा योजनेंतर्गत, पॉलिसीधारकाचा मुदतपूर्तीपूर्वी मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबालाही आर्थिक मदत मिळते.
मॅच्युरिटीवर (Maturity) एकरकमी रकमेचा लाभही उपलब्ध आहे. याचा अर्थ LIC च्या या योजनेत संरक्षण आणि बचत दोन्ही आहेत. या विम्यांतर्गत सर्वात कमी मूळ विमा रक्कम 75,000 रुपये प्रति जीवन आहे. कमाल मूळ विमा रक्कम 3 लाख रुपये आहे.
एलआयसी आधार शिला जास्तीत जास्त 3 लाख रुपयांना खरेदी केली जाऊ शकते. या पॉलिसीचा परिपक्वता कालावधी 10 ते 20 वर्षांच्या दरम्यान आहे. प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक उपलब्ध आहेत.
निरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला स्थगिती, शेतकऱ्यांना तात्पुरती मलमपट्टी?
इतका मिळेल परतावा
तुम्ही एका दिवसात 29 रुपये वाचवल्यास, तुम्ही एका वर्षात LIC आधार शिलामध्ये 10,959 रुपये गुंतवू शकता. समजा तुम्ही हे 20 वर्षांपासून करत आहात आणि तुम्ही 2,14,696 रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 3,97,000 रुपये परतावा मिळतो. ही योजना 8 ते 55 वयोगटातील महिलांसाठी आहे.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो पैसा कमवायचा ना? मग मांस उत्पादनासाठी अव्वल ठरणाऱ्या 'या' शेळीचे पालन करा
सरकार म्हणूनच शेतकरी आत्महत्या करतोय, फ्लॉवरची आली साडेनऊ रुपयांची पट्टी, शेती करायची तरी कशी?
शेतकरी मित्रांनो 'या' यंत्राने करा कमी खर्चात पीक फवारणी; पैशांची होईल मोठी बचत
Published on: 21 August 2022, 02:33 IST