Others News

भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) हे गुंतवणूकदारांची आवडती गुंतवणूक कंपनी आहे. नुकतेच एलआयसीने प्रधानमंत्री वय वंदना योजना सुधारित २०२० (pradhanmantri vaya vandana yojana) लॉन्च केली आहे.

Updated on 01 August, 2020 2:18 PM IST


भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) हे गुंतवणूकदारांची आवडती गुंतवणूक कंपनी आहे. नुकतेच एलआयसीने प्रधानमंत्री वय वंदना योजना संशोधित २०२० (pradhanmantri vaya vandana yojana) लॉन्च केली आहे. या योजेतून ६० पेक्षा अधिक वयाच्या लोकांना दर महिन्याला पेन्शन (pension scheme) च्या रुपात आर्थिक सहाय्यता उपलब्ध करुन दिली जाते. केंद्र सरकारने प्रधानमंत्री  वय वंदना योजना (pradhanmantri vaya vandana yojana 2020) ची मर्यादा २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेची सुरुवात ४ मे २०१७ ला झाली होती. या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी  पेन्शन  दिली जाते.  या योजनेनुसार ज्येष्ठ नागरिकांना मासिक पेन्शनचा पर्याय १० वर्षापर्यंत दिला जातो.

प्रधानमंत्री वय वंदना योनजेचे फायदे

एलआयसी (LIC) ने या योजनेला सुधारित करून परत एकदा लॉन्च केली आहे. ही एक नॉन-लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग पेन्शन स्कीम आहे.  या योजनेत १५ लाख रुपयांपर्यंतचे रक्कमेची गुंतवणूक करता येते.  पीएमव्हीव्हीवाय मध्ये वरिष्ठ नागरिकांचे वय ६० वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असावी. या पॉलिसीचा टर्म १० वर्षाचा असतो. 

किती मिळेल व्याज -

या योजनेच्या गुंतवणूकीत सुरुवातीला ७.६६ टक्के वार्षिक व्याज मिळते.  प्रत्येक १ एप्रिलला केंद्र सरकाराने व्याजदार निश्चित केली आहेत.  मासिक पेन्शनचा पर्याय निवडल्यानंतर वरिष्ठ नागरिकांना या योजनेतून १० वर्षापर्यंत एक निश्चित केलेली पेन्शन मिळत असते. यासह १० वर्षानंतर पेन्शन दिल्यानंतर जमा झालेली राशी  परत दिले जाते.

कसे कराल अर्ज

पीएम वय वंदनाच्या अंतर्गत अर्ज भरताना या फार्मसह आवश्यक कागदपत्र जोडावेत. यासाठी आपण www.licindia.in च्या लिंकवर क्लिक करून अर्ज भरू शकता.  दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक केल्यानंतर आपल्याला नोंदणी पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर अर्ज ओपन होईल. यात आपल्याला सर्व माहिती भरावी लागेल. यातनंतर अर्ज सबमिट करुन द्या. याप्रमाणे ऑनलाईन नोंदणी पूर्ण होईल.

English Summary: Invest in this scheme of the government, 10 thousand rupees will come every month
Published on: 01 August 2020, 02:17 IST