अनेकदा आपल्याला एकदाच एकरकमी गुंतवणूक करुन चांगला परतावा हवा असतो. तुम्ही देखील अशीच एखादी योजना शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. पोस्ट ऑफिसने एक SIP योजना आणली आहे, ज्यामध्ये प्रत्येक महिन्याला 5000 रुपये उपलब्ध होतील.
यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग्ज स्कीममध्ये (Post Office Monthly Income Scheme) एसआयपीद्वारे गुंतवणूक करू शकता. यामध्ये, काही काळानंतर, गुंतवणूकदारांना मासिक उत्पन्न योजनेची (POMIS) संधी मिळते. या योजनेत, तुम्ही एकरकमी रक्कम गुंतवून दरमहा तुमचे उत्पन्न मिळवू शकता.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पैसे
दरमहा पेन्शन मिळेल
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न (monthly income) योजनेवर सध्या वार्षिक 6.6% व्याजदर मिळत आहे. जर तुम्ही या योजनेत 9 लाख रुपये जमा केले असतील तर वार्षिक 6.6 टक्के दराने 1 वर्षासाठी एकूण 59,400 रुपये व्याज मिळेल.
ही रक्कम वर्षाच्या 12 महिन्यांत वितरित केली जाईल. अशा प्रकारे, प्रत्येक महिन्याचे व्याज सुमारे 4950 रुपये असेल. तुम्ही एकाच खात्यातून 4,50,000 लाख रुपये जमा केल्यास, मासिक व्याज 2475 रुपये असेल.
एलआयसीच्या 'या' योजनेत फक्त एकदाच पैसे जमा करा; आयुष्यभर खात्यात 50,000 रुपये येतील
असा घ्या फायदा
तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडावे लागेल. डॉक्युमेंटमध्ये ओळखपत्र म्हणून आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा मतदार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (Driving license) आवश्यक आहे. यासोबतच 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, सरकारने जारी केलेले ओळखपत्र किंवा युटिलिटी बिल पत्त्याच्या पुराव्यासाठी वैध आहे.
यानंतर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन POMIS फॉर्म भरू शकता. तुम्ही ते ऑनलाइनही डाउनलोड करू शकता. फॉर्म भरताना नॉमिनीचे नाव द्यावे लागेल. हे खाते उघडण्यासाठी सुरुवातीला 1000 रुपये रोख किंवा चेकद्वारे जमा करावे लागतील.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर केला 'हा' मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर
शेतकऱ्यांसाठी 'हे' खत ठरतंय वरदान; मिळतोय भरपूर नफा
पशुपालकांसाठी दिलासा देणारी बातमी; सरकार 2 लाख रुपयांपर्यंत करणार मदत
Published on: 11 September 2022, 03:52 IST