Others News

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला अनेक आजारांचा सामना करावा लागत असतो. आता  देशात कोरोनाने हाहाकार माजवला असून या विषाणूपासून वाचण्यासाठी कोणतीच लस अजून तरी उपलब्ध झालेले नाही.  फक्त कोरोनाच नाही तर  आपल्या बदलत्या जिवनशैलीमुळे अनेक जीवघेण्या आजारांमुळे आणि बेशिस्तीने वाहन चालणाऱ्यांमुळे  आपल्या जिवाला धोका असतो.  अशात आपण आरोग्य विमा केलेला योग्य असते.

Updated on 16 April, 2020 5:12 PM IST


सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला अनेक आजारांचा सामना करावा लागत असतो. आता  देशात कोरोनाने हाहाकार माजवला असून या विषाणूपासून वाचण्यासाठी कोणतीच लस अजून तरी उपलब्ध झालेले नाही.  फक्त कोरोनाच नाही तर  आपल्या बदलत्या जिवनशैलीमुळे अनेक जीवघेण्या आजारांमुळे आणि बेशिस्तीने वाहन चालणाऱ्यांमुळे  आपल्या जिवाला धोका असतो.  अशात आपण आरोग्य विमा केलेला योग्य असते. दवाखान्याचे बिल भरताना माणसाची दमछाक उडत असते. यामुळेच मोदी  सरकारने एक स्वस्त आरोग्य विमा  योजना (Insurance Scheme)  आणली आहे.  या योजनेतून अगदी १२ रुपयांत तुम्ही तुमच्या कुटुंबाची सुरक्षा करु शकता.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि पंतप्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) यात   गुतंवणूक केल्यानंतर आपल्याला एक तर तीन विमा कव्हर मिळतात. अपघात विमा कवर (Accidental Death Cover),  अपंगत्व कवर (Disability Cover) आणि लाईफ कवर जीवन विमा (Life Cover) हे विमा  मिळतात.  या योजनेसाठी आपल्या एकुण ३३० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.  ज्यात आपल्याला (Life Insurance Cover) जीवन विमा मिळेल.  याचप्रमाणे एकावेळी ३४२ रुपये प्रीमियम जमा करुन ३ विमा मिळवू शकता. 

या योजनेसाठी अर्ज करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ती म्हणजे योजना काढण्यासाठीचा वेळ, कारण अर्ज करण्याच्या तारखेनंतरच आपला हफ्ता ठरवला जातो. म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये तुम्ही अर्ज केला तर तुमचा हफ्ता ३३० रुपयांचा असेल. तर सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अर्ज केला तर हफ्ता हा २५८ रुपयांचा असेल तर डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीत अर्ज केल्यास १७२ रुपये , मार्च, एप्रिल आणि मे मध्ये अर्ज केल्यास ८६ रुपयांचा वर्षाला हफ्ता असेल.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY)

यात १८ ते ७० वयाचे नागरिक याचा फायदा घेऊ शकतात.  या वयोगटातील लोकांना अपघात कवर आणि  (अपंगत्व)  डिसएबिलिट  विमा कवर मिळेल. दुर्देवाने अपघात  झाला  त्यात व्यक्ती दगावल्यास किंवा काही अपंगत्व आल्यास काही दिवसातच आपल्याला या योजनेसाठी क्लेम करता येतो.  जर योजना घेणाऱ्यास हृदयाचा झटका आला तर आणि त्यात त्याचा मृत्यू झाला तर पैसे मिळत नाहीत.  अपघातात मृत्यू झाल्यास २ लाख रुपये आणि अपंगत्व आल्यास १ लाख रुपये क्लेम केला जाऊ शकतो.

पंतप्रधान जीवन ज्योति विमा योजना (PMJJBY)

या योजनेचा लाभ १८ ते ५० वयोगटातील नागरिक घेऊ शकतात. यात दोन लाख रुपयांचा जीवन विमा आहे. या योजनेत जर व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला २ लाख रुपयांचा दावा करता येतो.  या विमा योजनेसाठी वर्षाच्या दरम्यान अर्ज केल्यास अर्ज केल्याच्या तारखेवरुन हफ्ता निश्चित केला जातो. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) जून, जुलै, आणि ऑगस्ट महिन्यात घेतल्यास वर्षाला ३३० रुपयांचा हफ्ता द्यावा लागतो.  सप्टेंबर, ऑक्टोबर, आणि नोव्हेंबर महिन्यात घेतल्यास वर्षाला २५८ रुपये द्यावे लागतील. यासह डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीसाठी  १७२ रुपयांचा हफ्ता द्यावा लागेल.  जर  मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात विमा  घेतल्यास फक्त ८६ रुपये द्यावे लागतील. दरम्यान या योजनेसंदर्भात तुम्ही आपल्या जवळील बँकेशी संपर्क करु शकता. यासाठी आपण एलआयसी किंवा इतर विमा कंपन्यांतही अर्ज करु शकता.
 

English Summary: invest 86 rupees yearly to get PMSBY scheme benefits
Published on: 16 April 2020, 05:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)